Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
खंडोबाची आरती जय देवा खंडेराया  निजशिवरुप सखया  आरती ओवाळीतो

खंडोबाची आरती जय देवा खंडेराया निजशिवरुप सखया आरती ओवाळीतो

य देवा खंडेराया । निजशिवरुप सखया ॥

आरती ओवाळीतो । भावभंडारसुप्रीया ॥ धृ. ॥

देहत्रय गड थोर । हेचि दुर्घट जेजूर ।

तेथे तूं नांदतोसी ॥ आत्मसाक्षित्वे निर्धार ॥

उन्मनी म्हाळसा हे ।

शांतिबाणाई सकुमार ।

भुक्ति मुक्ति दया क्षमा । मुरळ्या नाचती सुंदर ॥ जय. ॥ १ ॥

स्वानंद अश्व थोर त्यावरि बैसोनि सत्वर ॥

अद्वैतबोध तीव्र । हाती घेउनि तरवार ॥

अहंकार मल्लासूर । त्यातें मारिसी साचार ॥

निवटुनी दैत्यगार । विजयी होसी तूं मल्हार ॥ जय. ॥ २ ॥

निरसोनी द्वैत भाव । करिसी तूं ठाणे अपूर्व । अद्वैतची भक्तदेव ।भेदबुद्धी मिथ्या वाव ।

तुजवीण न दिसे कोणी । जगिं या एकचि तू धणी ॥

मौनी म्हणे तुची सर्व । अससी व्यापक खंडेराव ॥ जय देवा. ॥ ३ ॥

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Webduniya Marathi