भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी नुकताच पोस्ट केलेला एक व्हिडिओ चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण थेट मुंबई पोलिसांनी दिलं. आता याच मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी खोट्या बातम्या पसरवल्याप्रकरणी सोमय्या यांना अटक करण्याची मागणी केली आहे. ट्विटवरुन खोपकर यांनी मुख्यमंत्री कार्यालय, मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांच्या ट्विटर हॅण्डलला टॅग करुन एक पोस्ट केली आहे.
अमेय खोपकर यांनी ट्विटवरुन पोस्ट करताना आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार खोट्या बातम्या पसरवणे गुन्हा असल्याचे म्हटले आहे. 'आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम ५४ अंतर्गत खोटी माहिती पसरवणाऱ्याला एक वर्ष तुरुंगवास होऊ शकतो.

