Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लोणीकंद भागात अपघातात शाळकरी मुलीचा मृत्यू

लोणीकंद भागात अपघातात शाळकरी मुलीचा मृत्यू

हिल्यानगर पुणे मार्गावर लोणीकंद भागात अपघातात दुचाकीवरून मैत्रिणीसह शिकवणीतून घरी जाणाऱ्या शाळकरी मुलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुलीचे वय १४ वर्षाचे असून अनन्यादादाभाऊ गावडे असे तिचे नाव आहे.
या प्रकरणी मोटारचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रपूरमध्ये खडीने भरलेला ट्रक नाल्यात कोसळला, चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, १० जून रोजी मयत अनन्याआणि तिची मैत्रीण शिकवणीला गेल्या होत्या. दुपारी शिकवणीतून घरी परत जाताना अहिल्यानगर रस्त्यावरील माउली बालश्रमाजवळ भरधाव येणाऱ्या मोटारीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात अनन्या गंभीर जखमी झाली. अपघातांनंतर मोटार चालक पसार झाला. अनन्याला गंभीर अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचाराधीन असता तिचा दुर्देवी मृत्यू झाला.

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार; हजारो महिलांनी महामार्ग रोखला

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपी मोटारचालकाचे शोध घेत आहे. याबाबत तिचे वडील अनिल दादाभाऊ गावडे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Webduniya Marathi