भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील ५ दिवस काही भागांत पावसाची, तर काही भागांत तीव्र उष्णतेची शक्यता आहे, समुद्रात निर्माण झालेल्या पोषक हवामानामुळे कोकण (रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड), पुणे, सातारा आणि कोल्हापूर परिसरामध्ये पुढील ५ दिवस वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो.
तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या भागांत पुढील ५ दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे.
अकोल्यात भीषण अपघात: अकोल्यातील शेगाव-बालापूर रस्त्यावर बस आणि बाईकची टक्कर होऊन भीषण आग
एकीकडे काही भागांत पावसाचे वातावरण असताना, विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
Edited By- Dhanashri Naik

