प्रतीकात्मक चित्र बकरीदच्या आधी मुंबईतील मीरा रोड परिसरात तणाव निर्माण झाला आहे. एका निवासी संकुलात बकऱ्या ठेवण्याच्या आणि त्यांचा बळी देण्याच्या प्रस्तावावरून झालेल्या वादाचे रूपांतर आंदोलनात झाल्यानंतर हा तणाव सुरू झाला.
हिंसाचाराच्या घटनाही घडल्या असून, यात विश्व हिंदू परिषदेचे (VHP) सदस्यही सामील झाले. हा वाद रविवारी मीरा रोडजवळील पूनम क्लस्टर १ मधील सृष्टी कॉम्प्लेक्समध्ये सुरू झाला.
बायकुला गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी सैफ मस्तानला अटक
हे शेड मुस्लिम समाजाच्या सदस्यांनी बकरीद साठी कापल्या जाणाऱ्या बकऱ्यांसाठी बांधण्यात आले होते. हिंदू समाजाने तक्रार केल्यांनतर हस्तक्षेप करत स्थानिक नगरपालिकेकडून ते शेड पाडण्यात आले.
मुंबईत बनावट जन्म दाखल्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश, महत्त्वाची कागदपत्रे गहाळ, एसआयटी तपास सुरू
रात्रीच्या वेळी पुन्हा हे शेड बांधण्यात आल्यावर हिंदू संघटनांच्या काही सदस्यांनी तिथे जमाव केला आणि दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाल्यावर वाद चिघळला आणि त्याला हिंसक वळण लागले.
राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! मुंबईतील प्रसिद्ध 'एअर इंडिया' इमारत १६०० कोटींना विकत घेणार
Edited By - Priya Dixit

