Dailyhunt
Mother's Day Wishes for Mother-in-Law in Marathi 2026 सासूबाईंसाठी मदर्स डेच्या शुभेच्छा मराठीत

Mother's Day Wishes for Mother-in-Law in Marathi 2026 सासूबाईंसाठी मदर्स डेच्या शुभेच्छा मराठीत

तुम्ही मला फक्त सून नाही तर

मुलगी मानून स्वीकारले,

याबद्दल मी तुमची कायम ऋणी राहीन

ई, तुम्हाला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सासू आणि सुनेच्या नात्यापलीकडे जाऊन

आपण एक मैत्रीचे नाते जपले आहे

माझ्या आयुष्यातील या सुंदर मार्गदर्शिकेला

मातृदिनाच्या शुभेच्छा

आईनंतर घर आणि मन सावरणारी

दुसरी व्यक्ती म्हणजे तुम्ही

माझ्या सासूबाईंना मातृदिनानिमित्त

उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना!

नव्या घरात आल्यावर मला आईची माया

आणि वडिलांचा आधार दोन्ही तुमच्यात मिळाले

अशा माझ्या लाडक्या सासूबाईंना हॅप्पी मदर्स डे!

तुमच्या संस्कारांमुळेच हे घर आनंदाने नांदत आहे

तुम्ही आमच्या घराची खरी लक्ष्मी आहात

सासूबाई, तुम्हाला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

आईसारखीच माया आणि सावली देणाऱ्या

माझ्या प्रेमळ सासूबाईंना

मातृदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा

तुम्ही नेहमी अशाच आनंदी राहा

प्रत्येक सुनेला तुमच्यासारखी समजूतदार सासू मिळो,

हीच सदिच्छा

माझ्या दुसऱ्या आईला मातृदिनाच्या

मनःपूर्वक शुभेच्छा!

घर कसं सांभाळावं आणि नाती कशी जपावीत,

हे तुमच्याकडून शिकायला मिळालं

माझ्या आदर्श सासूबाईंना मातृदिनाच्या शुभेच्छा!

रक्ताचं नातं नसलं तरी

मायेचं नातं मात्र खूप घट्ट आहे

आई, तुमच्या प्रेमासाठी

आणि पाठिंब्यासाठी मनापासून आभार

हॅप्पी मदर्स डे!

लग्नानंतर मला माझ्या आईची कमतरता

कधीच भासू दिली नाही,

अशा माझ्या प्रेमळ सासूबाईंना

मातृदिनाच्या मनापासून शुभेच्छा!

मायेची सावली देणाऱ्या सासूबाई,

लग्नानंतर आईचं प्रेम देणाऱ्या सासूबाई

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

माझ्या आईसमान सासूबाईंना

मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या प्रेमळ मार्गदर्शनामुळे

माझं आयुष्य सुंदर झालं आहे

माझ्या आयुष्यातील खास व्यक्ती,

सासूबाईंना मदर्स डेच्या शुभेच्छा

तुमचा दयाळू स्वभाव आणि प्रेम नेहमीच प्रेरणादायी आहे

हसत राहा आपली माऊली,

जिच्या प्रेमाची सावली आहे आमच्यावर

अशा प्रेमळ सासूबाईंना मातृदिनाच्या खूप शुभेच्छा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Webduniya Marathi