Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या हप्त्यात वाढ होण्याची शक्यता

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या हप्त्यात वाढ होण्याची शक्यता

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' अंतर्गत लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील लाखो महिलांना आर्थिक हातभार लावणाऱ्या या योजनेच्या हप्त्याच्या रक्कमेत आता लक्षणीय वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

ठाण्याच्या रुग्णालयात शिंदे गटाच्या नगरसेवकाची गुंडगिरी! महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला

राज्य सरकार कडून गरजू महिलांना आर्थिक दृष्टया सक्षम करण्यासाठी हफ्त्याची रक्कम वाढवण्याच्या हालचाली सुरु आहे. हे समजतातच महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता रकमेत किती वाढ होणार आहे अद्याप हे समजू शकले नाही.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली असून या योजनेत लाभार्थी महिलांना दरमहा आर्थिक मदत राज्य सरकार कडून १५०० रुपये दिले जातात.

महाराष्ट्रात 'बाहेरील' व्यक्तींना बाईक-टॅक्सी चालवण्यास बंदी; १ ऑगस्टपासून नवीन नियम लागू!

अलीकडेच झालेल्या बँक पडताळणी, ई-केवायसी आणि अपात्र अर्जाच्या छाननी नंतर पात्र लाभार्थ्यांची संख्या समोर आली असून खऱ्या गरजू लाभार्थींसाठी मासिक हफ्ता वाढवून देण्याचा चर्चा सुरु आहे.

महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; नाशिक, पालघर, रायगड, मुंबईत सतर्कतेचा इशारा

महिलांच्या बँक खात्यात सध्या जमा होणाऱ्या रक्कमेत वाढ झाल्यास त्यांना महागाईच्या काळात मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. या हप्ता वाढीबाबत सरकारकडून लवकरच अधिकृत घोषणा आणि शासन निर्णय जारी होण्याची शक्यता असून, आगामी काळात ही वाढ लागू झाल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी आणखी मोठी वरदान ठरणार आहे.

Edited By - Priya Dixit

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Webduniya Marathi