Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबई पासून सिंधुदुर्गपर्यंत कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये उष्णतेची भीषण लाट

मुंबई पासून सिंधुदुर्गपर्यंत कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये उष्णतेची भीषण लाट

वामान विभागने मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवत असून, कमाल तापमान ३४ ते ३८ अंशांपर्यंत पोहोचत आहे.
कोकणात उष्ण व दमट हवामान कायम असून समुद्रकिनारी भागातही उकाडा वाढला आहे.
मुंबई महानगर प्रदेश सह उत्तर कोकणात तापमान ३६-३८°C च्या आसपास पोहचले आहे. पुढील काही दिवसांत तापमानात १-२ अंश वाढ होण्याची शक्यता, त्यानंतर काही प्रमाणात घट होऊ शकते.

महाराष्ट्रातील हवामानाने पुन्हा एकदा वळण घेतले; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि विजांचा अंदाज वर्तवण्यात आला

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांसारख्या कोकणातील जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती कायम राहील. कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पोहोचू शकते. हवामान विभागाने या भागांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला असून, लोकांना उन्हात जाणे टाळण्याचा, भरपूर पाणी पिण्याचा आणि घराबाहेरील अनावश्यक कामे टाळण्याचा सल्ला दिला आहे. ही लाट एप्रिलमध्ये अधिक तीव्र होती आणि मे सुरुवातीला देखील कायम आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Webduniya Marathi