१. देवकुंड धबधबा ट्रेक रायगड
भिरा धरणाजवळून सुरू होणारा हा ट्रेक निसर्गाच्या अगदी जवळ घेऊन जातो. घनदाट जंगलातून जाणारा हा रस्ता अतिशय नयनरम्य आहे.
काठिण्य पातळी: सोपा ते मध्यम
वेळ: जाण्या-येण्यासाठी साधारण ४ ते ५ तास लागतात.
सुरक्षितता: ट्रेक तसा सपाट जमिनीवरून आहे, मात्र धबधब्याच्या मुख्य कुंडात पाण्याचा वेग खूप असतो. स्थानिक प्रशासनाने तिथे सुरक्षेसाठी दोर आणि गाईड्स ठेवलेले असतात. प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करा.
२. लोहगड किल्ला लोणावळा
पुणे आणि मुंबईतील ट्रेकर्ससाठी हा सर्वात जवळचा आणि सुरक्षित पर्याय आहे. पावसाळ्यात या किल्ल्याच्या पायऱ्यांवरून पाणी वाहत असते, ज्याला 'वॉटरफॉल स्टेप्स' म्हणतात.
काठिण्य पातळी: अगदी सोपा- नवशिक्यांसाठी उत्तम.
वेळ: मळवली रेल्वे स्टेशनवरून किंवा पायथ्यापासून १ ते २ तास.
सुरक्षितता: गडावर जाण्यासाठी व्यवस्थित पायऱ्या आणि रेलिंग बांधलेले असल्याने हा ट्रेक कौटुंबिक सहलीसाठीही अत्यंत सुरक्षित मानला जातो. फक्त पायऱ्यांवर शेवाळ असल्याने पाय घसरणार नाही याची काळजी घ्या.
३. कळसूबाई शिखर अहमदनगर
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर (१६४६ मीटर) असले तरी पावसाळ्यात येथे ट्रेकर्सची मोठी गर्दी असते. ऑगस्टमध्ये संपूर्ण शिखर धुक्यात हरवलेले असते.
काठिण्य पातळी: मध्यम- चढण जास्त आहे.
वेळ: पायथ्याच्या बारी गावातून वर जाण्यासाठी ३ ते ४ तास लागतात.
सुरक्षितता: अवघड आणि उभ्या चढणीच्या ठिकाणी वन विभागाने मजबूत लोखंडी शिड्या बसवल्या आहे, ज्यामुळे हा ट्रेक सुरक्षित झाला आहे. वादळी वारा आणि मुसळधार पाऊस असेल तर शिड्यांवरून जाताना सावधगिरी बाळगावी.
४. राजमाची ट्रेक लोणावळा/कर्जत
उदयनगर आणि श्रीवर्धन या दोन किल्ल्यांचा मिळून राजमाची बनतो. हा ट्रेक त्याच्या लांब पण निसर्गरम्य मार्गासाठी प्रसिद्ध आहे.
काठिण्य पातळी: सोपा लांब चालण्याचा ट्रेक
वेळ: लोणावळ्यावरून आल्यास साधारण १५-१६ किमी सपाट चालणे आहे. कर्जत (कोंढाणे गुहा) मार्गे आल्यास ३ तास चढण आहे.
सुरक्षितता: लोणावळा मार्ग अतिशय सोपा आणि सुरक्षित आहे. ऑगस्टमध्ये वाटेत अनेक छोटे धबधबे आणि जंगलाचे सौंदर्य पाहायला मिळते.
''सिंधुदुर्ग'' महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील अत्यंत सुंदर, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ
५. अंधारबन जंगल ट्रेक पुणे
नावानुसारच हे एक घनदाट जंगल असून, जिथे दुपारच्या वेळीही सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नाही. कुंडलिका दरीचा सुंदर नजराणा या ट्रेकवरून दिसतो.
काठिण्य पातळी: मध्यम
वेळ: साधारण ५ ते ६ तासांचे चालणे- डोंगरावरून खाली उतरणे.
सुरक्षितता: जंगलात वाट चुकण्याची शक्यता असल्याने स्थानिक गाईड सोबत घेणे बंधनकारक आणि अत्यंत सुरक्षित ठरते. पाऊस जास्त असल्यास वाटेतील ओढे ओलांडताना गाईडची मदत होते.
मान्सून ट्रेकिंगसाठी अत्यंत महत्त्वाच्या सुरक्षा टिप्स
१. नदी आणि धबधब्यांच्या पात्रात उतरू नका: पावसाळ्यात डोंगरावरून अचानक पाण्याचा प्रवाह वाढतो, त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात उतरणे टाळा.
२. हवामानाचा अंदाज घ्या: अतिवृष्टीचा इशारा असेल, तर ट्रेक रद्द करा.
३. फुटवेअर: ट्रेकिंगसाठी चांगल्या ग्रीपचे स्पोर्ट्स शूझ किंवा ट्रेकिंग शूझच वापरा; फ्लोटर्स किंवा चपला घालू नका.
४. ग्रुपमध्ये फिरा: कधीही एकटे ट्रेकिंगला जाऊ नका. नेहमी अधिकृत ट्रेकिंग ग्रुप्स किंवा मित्रांसोबत जा.
देशात या ठिकाणी पडतो सर्वाधिक पाऊस, हिरवळ आणि नैसर्गिक दृश्यांचे प्रेमी असाल तर नक्कीच भेट द्या

