Dailyhunt
Panipuri सर्वांची लाडकी 'स्ट्रीट स्टाईल' रेसिपी; "घरीच बनवा मार्केटसारखी पाणीपुरी"

Panipuri सर्वांची लाडकी 'स्ट्रीट स्टाईल' रेसिपी; "घरीच बनवा मार्केटसारखी पाणीपुरी"

पाणीपुरी म्हणजे सगळ्यांचा जीव की प्राण! असं कोणीच नसेल कि ज्याला पाणी पुरी आवडत नाही. चटपटीत पाणी, बटाट्याचा मसाला आणि कुरकुरीत पुरी हे नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. घरी मार्केट सारखी पाणीपुरी बनवण्यासाठी ही सोपी रेसिपी नक्कीच ट्राय करा.

१. पाणीपुरीचे तिखट पाणी

हे पाणी चटपटीत आणि पचायला हलके असते.
साहित्य-
१ कप पुदिना पाने
१/२ कप कोथिंबीर
३-४ हिरव्या मिरच्या (तिखटानुसार)
१ इंच आले
१ मोठा चमचा चिंचेचा कोळ (किंवा लिंबाचा रस)
१ चमचा चाट मसाला
१ चमचा भाजलेली जिरे पूड
काळे मीठ (चवीनुसार)
बूंदी (वरतून घालण्यासाठी)
१ लिटर थंड पाणी

कृती-
१. पुदिना, कोथिंबीर, मिरची आणि आले थोडे पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्या.
२. हे मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढा आणि त्यात १ लिटर पाणी मिसळा.
३. आता त्यात चाट मसाला, जिरे पूड, काळे मीठ आणि चिंचेचा कोळ घालून व्यवस्थित हलवा.
४. पाणी गाळून घेतल्यास अधिक चांगले लागते. शेवटी वरून खारी बूंदी टाका.

२. गोड चटणी

साहित्य:
१/२ कप चिंच (बियांशिवाय)
१/२ कप गूळ (बारीक केलेला)
१/२ चमचा लाल तिखट
मीठ चवीनुसार

कृती-
१. चिंच आणि गूळ एक कप पाण्यात १०-१५ मिनिटे उकळून घ्या.
२. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरला फिरवून घ्या आणि गाळून घ्या.
३. यात लाल तिखट आणि थोडे मीठ घालून नीट मिक्स करा. तुमची गोड चटणी तयार!

३. बटाट्याचा मसाला

साहित्य-
३-४ उकडलेले बटाटे
१/२ कप उकडलेले काळे चणे (ऐच्छिक)
१ बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेली कोथिंबीर
१/२ चमचा लाल तिखट
मीठ चवीनुसार

कृती-
१. एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे मॅश करून घ्या.
२. त्यात चणे, कांदा, कोथिंबीर, तिखट आणि मीठ घालून एकत्र करा.
४. सर्व्ह करण्याची पद्धत

पुरीला मध्यभागी छिद्र करा. त्यात थोडा बटाट्याचा मसाला भरा. थोडी गोड चटणी टाका. आणि मग थंडगार तिखट पाण्यात पुरी बुडवून फस्त करा!
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

भाजीला हॉटेलसारखी रिच ग्रेव्ही आणि चव देण्यासाठी काही खास 'किचन सीक्रेट्स'

Edited By- Dhanashri Naik

हॉटेलसारखी बिर्याणी घरीच बनवा: ही पद्धत आजपर्यंत कुणीच सांगितली नसेल! अचूक चवीसाठी खास सिक्रेट टिप्स

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Webduniya Marathi