Saturday, 23 Jan, 10.23 pm वेबदुनिया

आरोग्य
रोग प्रतिकारक शक्ती बळकट करण्यासाठी या 5 गोष्टी वापरा

आजच्या युगात रोगराई
वाढली आहे की कधीही आपल्याला बळी बनवू शकते आणि जेव्हा पासून कोरोना साथीचा रोग पसरला आहे ही चिंतेची बाबच आहे की आपली रोग प्रतिकारक शक्ती कशी वाढविता येईल आणि कोणत्याही प्रकारे अशक्तपणा जाणवू नये.
या साठी लोक बऱ्याच गोष्टी वापरतात ज्यामुळे शरीराला फायदा होईल.असं करणं योग्य देखील आहे.
आपल्याला अशा गोष्टींचे सेवन करायला पाहिजे ज्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढेल आणि स्वतःला निरोगी अनुभवू. चला तर मग जाणून घेऊ या की अशा कोणत्या गोष्टी आहेत.

1 दूध-

दूध एक असं आहार आहे, जे आपल्याला बऱ्याच प्रकारे फायदा मिळवून देतो. डॉक्टर देखील दूध पिण्याचा सल्ला देतात. या मध्ये असे बरेच घटक असतात जे शरीराला संपूर्ण पोषण देतात. दुधात कॅल्शियम, प्रथिन रायबोफ्लेवीन सारखे पोषक घटक असतात हे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यात मदत करतात. तसेच अनेक रोगांपासून दूर ठेवतात. रात्री झोपण्याच्या पूर्वी हळदीचं दूध किंवा सकाळी न्याहारीत दुधाचं सेवन केल्यानं शरीरास अनेक लाभ मिळतात.

2 बटाटे-

ही एक अशी भाजी आहे, जे आपण दररोज कोणत्या न कोणत्या प्रकारे आहारात समाविष्ट करतो. बटाटे तळून खाण्याऐवजी उकळवून खाणे एक चांगला पर्याय आहे. बटाट्याचे सेवन केल्यानं अशक्तपणा येत नाही. या मध्ये अनेक खनिज लवणं प्रथिन, कार्बोहायड्रेट्स आणि व्हिटॅमिन्स आढळतात. ह्याचे सेवन करून आपण शरीराला अनेक फायदे देऊ शकतो. म्हणून बटाट्याचे सेवन आवर्जून करावे आणि आपल्या आहारात ह्याचा समाविष्ट करावा.


3 नारळाचं पाणी -

नारळाचं पाणी प्यायल्यानं शरीराला अनेक रोगांपासून दूर ठेवता येत. एक नारळाच्या पाण्यात दोन ग्लास ज्यूस किंवा रसाचे गुणधर्म असतात. ह्याचे
सेवन केल्यानं शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. तसेच ह्यामध्ये बरेच पौष्टिक तत्त्व आढळतात, ज्यांची आवश्यकता शरीराला रोगांशी लढण्यासाठी असते. या मध्ये प्रथिन, ऊर्जा,कार्बोहायड्रेट,कोलेस्ट्रॉल,व्हिटॅमिन-सी,ए आणि ई सारखे अनेक महत्त्वाच्या गोष्टी आढळतात. म्हणून मधून -मधून ह्याचे सेवन करावे.

4 पपई -

बऱ्याच लोकांना पपई खाणं आवडत नाही,परंतु पपई पोटाला स्वच्छ ठेवण्यात मदत करते. या मध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी अनेक लाभ देतात. म्हणून ह्याचे सेवन करावे.

5 टोमॅटो-

टोमॅटोचे सेवन सॅलड,भाजीत किंवा सूप म्हणून देखील करू शकता. या मध्ये व्हिटॅमिन,पोटॅशियम,लायकोपिन चांगल्या प्रमाणात असत. म्हणून टोमॅटो खाण्याचा सल्ला दिला जातो.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Webduniya Marathi
Top