माहितीनुसार या अपघातात ४ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडला.अशी माहिती समोर आली आहे.पुणे कॉलेजमध्ये मनसेचा गोंधळ! अमित ठाकरेंनी हटवला पंतप्रधान मोदींचा फोटो, प्राचार्यांनी एफआयआर दाखल केला
मिळालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील कैलास टेकडी आणि सहस्त्रकुंड येथील महादेवाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला यामध्ये चालकासह ४ भाविकांचा मृत्यू झाला तर ६ जण गंभीर जखमी झालेत. श्रावणी सोमवारनिमित्त महादेवाचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतत असताना हा अपघात झाला. भाविक जेव्हा दर्शन आटोपून महिंद्रा कमांडर जीपने तेलंगणाकडे परतत होते, तेव्हा तोटंबा घाटातील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. सर्व मृत भाविक तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यातील कुबेर मंडळातील पारडी गावचे रहिवासी होते.मुंबईत महागाईचा डबल अटॅक; CNG-PNG महागले, ऑटो आणि काळी-पिवळी टॅक्सीच्या भाड्यातही वाढ
Edited By- Dhanashri Naik