Friday, 11 Jun, 4.00 pm वेबदुनिया

लाईफस्टाईल
श्रावण मासी हर्ष मानसी

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे

क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे

मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे

तरू शिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे उन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा

पूर्ण नभांवर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा

बलाक माला उडता भासे कल्प सुमनची मालाची ते

उतरुनी येती अवनीवरती ग्राहगोलाची की एकमते

सुंदर परडी घेऊनी हाती पुरोपकंठी शुध्दमती

सुंदर बाला त्या फुल माला रम्य फुले पत्री खुडती

सुवर्ण चंपक फुलाला विपिनी रम्य केवडा दरवळला

पारिजातही
बघता भामारोष मनीचा मावळला

फडफड करून थकले अपुले पंख पाखरे सवरती

सुंदर हरणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही
चरती राणी गोपही गाणी गात फिरे

मंजुळ पाव गात त्याचा श्रावण महिमा एक सुरे

देव दर्शन निघती ललना हर्ष माइ ना हृदयात

वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत


- बालकवीDailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Webduniya Marathi
Top