हैदराबादमध्ये तमिळ अभिनेता आर्या आणि चित्रपट निर्मात्यांविरुद्ध सुमारे १.८० कोटी रुपयांची फसवणूक आणि धमक्या दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान खरेदी केलेल्या महागड्या उपकरणांच्या थकीत पेमेंटमधून हा संपूर्ण वाद निर्माण झाला आहे. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला आहे. या बातमीमुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे, कारण अभिनेता आर्या एक अत्यंत आदरणीय आणि व्यावसायिक अभिनेता मानला जातो.
गदर २' नंतर सनी देओल पुन्हा एकदा लाहोरमध्ये धुमाकूळ घालणार
हा कायदेशीर वाद हैदराबादमधील ज्युबिली हिल्स पोलीस स्टेशनमध्ये सुरू झाला. कॅमेरे आणि इतर शूटिंग उपकरणे भाड्याने देणाऱ्या एका सुप्रसिद्ध कंपनीने अभिनेता आर्या आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध औपचारिक तक्रार दाखल केली आहे....तर याला लव्ह जिहादचे उदाहरण मानायचे का? आमिर खानच्या लग्नावरून नितेश राणेंचा सवाल
Edited By- Dhanashri Naik
