Tuesday, 26 May, 10.28 pm वेबदुनिया

अर्थजगत
टाटा समुहाचा नवा उपक्रम, कोविड - १९ च्या संदर्भात आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांना सहाय्य करणार

टाटा समूह आता कोविड - १९ च्या संदर्भात आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांना सहाय्य करण्यासाठी सरसावली आहे. टाटा ट्रस्ट्स आणि टाटा ग्रुपने कोविड-१९ रुग्णांवरील उपचार आणि त्यांच्या देखभालीची अधिक जास्त कौशल्ये आत्मसात करता यावी, याकरता आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांना सहाय्य करण्यासाठी दोन नामांकित वैद्यकीय संस्थांसोबत हातमिळवणी केली आहे. यामध्ये वेल्लोरचे ख्रिश्चन मेडिकल कॉलेज (सीएमसी) आणि हैद्राबादचे केयर इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस (सीआयएचएस) या संस्थांचा समावेश आहे. या दोन संस्थांच्या सहयोगाने टाटा ट्रस्ट्सचा हा उपक्रम चालवला जाणार असल्याची माहिती त्यांच्या जनसंपर्क विभागातर्फे देण्यात आली आहे.

यासंबंधी टाटा ट्रस्ट्सचे संस्थापक रतन टाटा यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'आजवरच्या सर्वात गंभीर समस्यांपैकी एक कोविड - १९ विरोधातील लढाईसाठी आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी तात्काळ आपत्कालीन साधने तैनात करणे गरजेचे आहे. खास तयार करण्यात आलेले २२ तासांचे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम हे निवडक रुग्णालयांनी निश्चित केलेल्या विशिष्ट कर्मचाऱ्यांसाठी असून ते मोफत दिले जात आहेत. दरम्यान, गंभीर स्थितीतील रुग्णांवरील उपचारांच्या व्यवस्थापनातील तज्ज्ञ असलेल्या आयसीयू फिजिशियन्स आणि इंटेन्सिव्हिस्टसना कोविड-१९ रुग्णांवरील उपचारांसाठी मोठ्या संख्येने डॉक्टर्स, नर्सेस आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची मदत भासणार आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी नॉन-आयसीयू व्यावसायिकांना गंभीर स्थितीतील रुग्णांवरील उपचार तसेच त्यांच्या देखभालीची मूलभूत तत्त्वे व प्रक्रिया यांची माहिती मिळवून देणे, हा या प्रशिक्षण कार्यक्रमांचा उद्देश आहे.'

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Webduniya Marathi
Top