Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
उपचारासाठी नागपूरला जात असलेल्या आई आणि मुलाचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू

उपचारासाठी नागपूरला जात असलेल्या आई आणि मुलाचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू

कुही-नागपूर रस्त्यावर नवगाव फाट्याजवळ बोलेरो पिकअपची धडक बसल्याने, उपचारासाठी नागपूरला जात असलेल्या आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अमरावतीत अंधश्रद्धेच्या कळस,पोटदुखीवर उपाय म्हणून १५ दिवसांच्या मुलीला गरम विळाने चटके

मिळालेल्या माहितीनुसार उपचारासाठी आपल्या आईला बाईकवरून नागपूरला घेऊन जाणाऱ्या मुलाचा नियतीने बळी घेतला. गुरुवारी कुही-नागपूर मुख्य रस्त्यावरील नवगाव फाट्याजवळ डाळ मिलसमोर एका भरधाव बोलेरो पिकअपने बाईकला समोरून धडक दिली. या भीषण अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू झाला. मेंढेगावसह संपूर्ण कुही तालुक्यात शोकाची लाट पसरली आहे. कुही तालुक्यातील मेंढेगाव येथील रहिवासी दिनेश मुरलीधर ठाकरे यांचा अपघातात मृत्यू झाला. दिनेश आपल्या आई, सत्यफुला ठाकरे यांना उपचारासाठी आपल्या बाईकवरून नागपूरला घेऊन जात होता. दरम्यान, नवगाव फाट्याजवळ, त्याच्या बाईकला समोरून येणाऱ्या बोलेरो पिकअपने धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की बाईकवरील आई आणि मुलगा गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने कुही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि कुही पोलिसांच्या ताब्यात दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी विमानतळाजवळ जागतिक दर्जाचे संमेलन केंद्र उभारण्याची मोठी घोषणा केली

Edited By- Dhanashri Naik

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Webduniya Marathi