Dailyhunt
उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी आरोग्यदायी पर्याय खरबुजाचे चविष्ट ज्यूस

उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी आरोग्यदायी पर्याय खरबुजाचे चविष्ट ज्यूस

न्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी आणि उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी खरबुजाचे ज्यूस हा एक अतिशय आरोग्यदायी पर्याय आहे. खरबूज नैसर्गिकरित्या गोड असल्याने यात साखर कमी लागते.

१. साधे आणि रिफ्रेशिंग खरबूज ज्यूस

हे ज्यूस पचायला हलके आणि झटपट होणारे आहे.

साहित्य-

२ कप खरबुजाचे तुकडे (सोलून घेतलेले)

१ चमचा लिंबाचा रस

४-५ पुदिन्याची पाने

चवीनुसार साखर किंवा मध (ऐच्छिक)

चवीनुसार थोडे काळे मीठ

बर्फाचे तुकडे

कृती-

सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात खरबुजाचे तुकडे, पुदिना, लिंबाचा रस आणि काळे मीठ एकत्र घ्या. हे मिश्रण एकजीव होईपर्यंत फिरवून घ्या. खरबुजात पाणी असते, त्यामुळे वेगळे पाणी घालण्याची गरज पडत नाही. ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाका आणि वरून ज्यूस ओतून थंडगार सर्व्ह करा.

२. 'मस्कमेलन शेक' (क्रीमी स्टाईल)

जर तुम्हाला थोडे घट्ट आणि शाही ज्यूस आवडत असेल, तर ही पद्धत वापरून पहा.

साहित्य:

२ कप खरबुजाचे तुकडे

अर्धी वाटी थंड दूध किंवा १ स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम

२ चमचे साखर

बदामाचे आणि पिस्त्याचे काप

चिमूटभर वेलची पूड

कृती-

सर्वात आधी मिक्सरमध्ये खरबूज, साखर, थंड दूध आणि वेलची पूड एकत्र करून ब्लेंड करा.जर तुम्हाला अधिक घट्ट हवे असेल, तर दुधाऐवजी आईस्क्रीम वापरा.ग्लासमध्ये ओतल्यानंतर वरून ड्रायफ्रूट्सचे काप टाकून सजवा.

Summer Special Juice Recipes घरी बनवलेले हे नैसर्गिक ज्यूस नक्कीच ट्राय करा

खरबूज ज्यूस पिण्याचे फायदे-

हायड्रेशन: यात पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते, जे उन्हाळ्यात डिहायड्रेशन रोखते.

डोळ्यांसाठी उत्तम: खरबुजात 'व्हिटॅमिन ए' भरपूर असते, जे डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

पचन: यात फायबर असल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.

ब्लड प्रेशर: खरबुजातील पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik

Grape Juice उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देण्यासाठी उत्तम पर्याय द्राक्षाचे ज्यूस

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Webduniya Marathi