Tuesday, 04 May, 10.46 pm वेबदुनिया

लाईफस्टाईल
वर्क फ्रॉम होम करताना या 5 गोष्टींना लक्षात ठेवा,

कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. आजच्या कठीण काळात मोठ्या कंपन्या देखील वर्क फ्रॉम होम पद्धती अवलंबवत आहे. या दरम्यान लोकांचा आरोग्यावर दुष्प्रभाव पडत आहे. या काळात आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी जाणून घेऊ या.

1 ऑफिसमध्ये संतुलित खान-पान करत होतो परंतु घरात कामाच्या मध्ये काही न काही खालले जात आहे. बऱ्याच वेळा चहा, कॉफी, पिण्याची इच्छा होते.असं करू नये. ठरलेल्या वेळीच खावे.

2 वर्क फ्रॉम होम मध्ये आपल्या ऑफिस सारखे काम करा. वेळे वर जेवण करा.जास्त खाऊ नका संतुलित आहार घ्या.

3 घरातून काम करताना जंक फूड खाऊ नका.


4 कामाच्या दरम्यान पाणी पिणं विसरतो असं करू नका. नेहमी आपल्या जवळ एक पाण्याची बाटली ठेवा. थोड्याथोड्या वेळाने पाणी प्यावे. तहान लागली नसेल तरीही पाणी प्यावं. असं केल्याने आपल्याला पाण्याची कमतरता होणार नाही.

5 वर्क फ्रॉम होम मध्ये आपल्या जवळ कोणीच नसत.ऑफिसात तरी सहकारी असतात ज्यांच्या कडे जाऊन आपण बोलून विश्रांती घेऊ शकतो. घरातून काम करताना देखील 5 ते 10 मिनिटांची विश्रांती घ्या. असं केल्याने आपल्या डोळ्यांना देखील विश्रांती मिळेल आणि आपले मेंदू देखील ताजे तवाने होईल.Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Webduniya Marathi
Top