Wednesday, 03 Jun, 9.06 pm WORLD मराठी न्यूज

होम
आधी कोरोना आता चक्रीवादळ; मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या कामाचे अर्शद वारसीने केले कौतुक

"मला नाही वाटत उद्धव ठाकरे यांच्या इतक्या संकटांचा सामना आजवर कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी कार्यकालावधीच्या सुरुवातीलाच केला असेल. सध्या मुंबई एका प्राणघातक विशाणूच्या विळख्यात अडकली आहे. हे कमी होतं की काय तेवढ्यात चक्रीवादळ येतय." अशा आशयाचे ट्विट अभिनेता अर्शद वारसीने केलं आहे. त्याचं हे ट्विट चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे जनतेशी संवाद साधला. यानंतर बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी यानं एक ट्वीट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामाचं कौतुक करत त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: World Marathi
Top