Saturday, 13 Feb, 10.06 am WORLD मराठी न्यूज

होम
'बिग बीं'नी गाठली पवारांची बारामती; मिसेस उपमुख्यमंत्र्यांनी घेतली भेट

बारामती - बॉलिवूड अभिनेते बिग बी अर्थात अमिताभ बच्चन आणि अभिनेता अजय देवगण यांनी बारामतीला भेट दिल्याचे समोर आले आहे. बारामती येथील विमानतळावर मुख्यमंत्रीमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी अमिताभ यांची भेट घेतली. यावेळी अजय देवगन देखील उपस्थित होता.

बारामती येथील विमानतळावर बच्चन आणि देवगण यांच्या आगामी हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण पार पडल्याचे समजते. यापूर्वी २००४ मध्ये देखील अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, शुत्रघ्न सिन्हा यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण बारामती येथील विमानतळावर पार पडले होते.

दरम्यान बच्चन आणि अजय यांच्या विमानतळावरील चित्रीकरणाबाबत अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीविषयी बारामतीकरांना कल्पनाही नव्हती. मात्र सुनेत्रा पवार यांच्यासोबतचे दोन्ही अभिनेत्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याबाबत बारामतीकरांना माहिती मिळाली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: World Marathi
Top