Saturday, 13 Feb, 11.06 am WORLD मराठी न्यूज

होम
कुख्यात गुंड गजा मारणे तुरूंगातून बाहेर येणार

पुणे - कुख्यात गजा मारणे आता तुरूंगातून बाहेर येणार आहे. अमोल बधे खून प्रकरणात निर्दोष झाल्यानंतर आता नीलेश घायवळ टोळीतील सदस्य संतोष ऊर्फ पप्पू हिरामण गावडे याच्या खूनप्रकरणीही मारणेसह इतर आरोपींची विशेष मोक्का न्यायाधीश ए.वाय.थत्ते यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

या खटल्यात बचाव पक्षातर्फे सुधीर शहा,ॲड. विजयसिंह ठोंबरे, ॲड. विपुल दुशिंग व ॲड. जितू सावंत, ॲड. राहुल भरेकर आणि ॲड. विद्याधर कोशे यांनी काम पाहिले.

गावडे याचा 3 नोव्हेंबर 2014 रोजी मध्यरात्री लवळे येथील गावडे वस्तीजवळ कोयता, सुऱ्याने वार करत खून करण्यात आला आहे. या प्रकरणी नीलेश ज्ञानेश्‍वर जाधव (वय 22, रा. कोथरूड) याने पौंड पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार गजानन मारणे (रा. कोथरूड) याच्यासह 18 जणांवर गुन्हा दाखल आहे.

एक जण फरार असून, त्यापैकी 17 जणांची मुक्तता झाली. या खुनानंतर गजानन मारणे आणि नीलेश घायवळ या टोळ्यांमध्ये पुन्हा भडका उडाला होता. जमिनीच्या व्यवहारातील टोळीचे आर्थिक वर्चस्व कायम ठेवणे आणि पूर्वीच्या वादातून डोक, तोंड आणि पोटावर कोयत्याने वार करून खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: World Marathi
Top