Tuesday, 23 Mar, 3.15 am WORLD मराठी न्यूज

होम
प्रेमीयुगुलास हटकने पडले महागात; चाकूने भोसकून केला खून

रस्त्यालगत अश्लिल चाळे करणार्‍या प्रेमीयुगुलास हटकल्याच्या कारणातून दोनजणांनी एकाची धारदार शस्त्राने खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.१२) दुपारी ३.३० वाजेदरम्यान नवीन नाशिकमधील संभाजी स्टेडीयमजवळ घडली. पोलिसांनी फरार झालेल्या संशयित दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांना टीप दिल्याच्या संशयातून तडीपार गुंडाने साथीदारांच्या मदतीने व्दारका परिसरात तरुणाची चाकूने भोसकून खून केल्याची घटना ताजी असतानाच ही घटना भरदिवसा घडल्याने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.

पंडितनगर, मोरवाडी येथील योगेश प्रकाश तांदळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सिडको वसाहत येथील आदित्य दीपक सुतार, पाथर्डी फाटा, इंदिरानगर येथील राहुल वसंत माळोदे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. संभाजी स्टेडियमजवळील रस्त्यालगत प्रेमीयुगुल अश्लिल चाळे करत होते. त्यावेळी योगेश तांदळेने त्यांना हटकले. राग अनावर झाल्याने संशयित दोघांनी त्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वर्मी घाव केले. त्यात तांदळे याचा जागीच मृत्यू झाला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: World Marathi
Top