Saturday, 13 Feb, 9.06 am WORLD मराठी न्यूज

होम
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून मंत्र्यांच्या समर्थकांची बॅनरबाजी; दिला 'हा' मॅसेज

यवतमाळ : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी (Pooja Chavan suicide) भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी थेट शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड (Maharashtra Minister Sanjay Rathod) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. यानंतर आता संजय राठोड यांचे समर्थक सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाले आहेत.

संजय राऊत यांच्या समर्थनासाठी सोशल मीडियावर अनेक फोटो, मॅसेज, कमेंट्स पोस्ट केल्या जात आहे. त्याशिवाय सोशल मीडियावर समर्थकांनी त्यांना समर्थन करणारे अनेक बॅनर पोस्ट केले आहेत. फेसबुकवरही त्याच्या समर्थकांनी अनेक बॅनर पोस्ट केले आहेत.

"जिसकी कामयाबी रोकी नहीं जा सकती, उसकी बदनामी शुरु की जाती है!!" अशी पोस्ट एका समर्थकाने फेसबुकवर केली आहे. यासह अनेक समर्थकांनी त्यांच्या समर्थनासाठी फेसबुकवर पोस्ट टाकल्या आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: World Marathi
Top