Saturday, 13 Feb, 10.06 am WORLD मराठी न्यूज

होम
तीन वेळा कार अंगावर चढवून नगरसेवकाची हत्या; घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद

काकिनाडा : आरोपींनी एका नगरसेवकाच्या अंगावर कार चढवून अक्षरशः चिरडून मारलं आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होतं आहे. आरोपीने नगरसेवकाच्या अंगावर कार घालून तब्बल दोन वेळा कार पुढे-मागे केली आहे. या दुर्दैवी घटनेत नगसेवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या अधारे आरोपीला बेड्या ठोकल्या असून ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना आंध्रप्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील काकिनाडा येथील आहे. येथील एका नगरसेवकाला एका युवकाने कारने चिरडून मारलं आहे. या घटनेतील मृत नगरसेवकाचं नाव काम्परा रमेश असं असून गुरजाला चिन्ना नावाच्या आरोपीने त्यांना चिरडलं आहे. यावेळी काही प्रत्यक्षदर्शी लोकांनी या कारला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी गुरजालाने भररस्त्यात दोन वेळा कार मागे पुढे रमेश यांच्या अंगावर घातली आहे. या सर्व घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: World Marathi
Top