मुंबई | राज्यातील वाहतूकीचा कणा म्हणून महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाच्या गाड्यांना ओळखलं जातं. महामंडळाकडं एसटीचा कारभार असल्यानं सातत्यानं एसटीच्या कर्मचाऱ्यांचं काहीतरी प्रकरण रस्त्यावर आपण पाहात असतो.
आता ऐन दिवाळीच्या तोंडावर महागाई भत्ता आणि इतर मागण्यांसाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला होता. पण महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्या मध्यस्थीनंतर कर्मचाऱ्यांनी बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
आज दिवसभर राज्यभर विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चालू होतं. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होत होती. कर्मचाऱ्यांच्या मागणीनूसार महागाई भत्त्यात 12 टक्क्यांवरून 28 टक्के इतकी वाढ करण्यात आल्याचं अनिल परब यांनी घोषित केलं आहे. परिणामी कर्मचाऱ्यांनी हा संप मागे घेतल्याचंही परब म्हणाले आहेत. कर्मचाऱ्यांनी संप मागं घेतल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आज राज्यभर मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचाऱ्यांनी बंद यशस्वी केला होता. एसटीमध्ये जवळपास 1 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. पण गेल्या काही वर्षात एसटी महामंडळ तोट्यात असल्यानं कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असल्याचं कर्मचारी सांगत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या तत्वावर एसटीचं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये विलिनीकरण व्हावी अशी मागणी वारंवार एसटी कर्मचारी संघटना करत असतात.
दरम्यान, राज्याच्या प्रवासी वाहतूकीचा सर्वाधिक भार लालपरी आपल्या खांद्यावर अव्याहतपणे वाहत असते. ग्रामीण भागात तर एसटीशिवाय दुसरी पर्यायी वाहतूक व्यवस्था सुद्धा आपल्याला पहायला मिळत नाही, असही नागरिक म्हणतात. सध्यातरी एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटल्यात जमा आहे.
थोडक्यात बातम्या
संगीत क्षेत्रातही नरेंद्र मोदी नावाचा डंका! आता 'नरेंद्र' नावाच्या रागाची निर्मिती
दिवाळीआधी सोनं पुन्हा महागलं! वाचा आजचा सोने-चांदीचा भाव
कॅरेबियन संघासाठी तारणहार धावला! 'या' दिग्गज अष्टपैलू खेळाडूची संघात एन्ट्री
गुंतवणूकदारांना मोठा फटका! सेनसेक्समध्ये सहा महिन्यातील सर्वात मोठी घसरण
'जर गाडीत चहाचा थेंब जरी सांडला तर मी.'; गडकरींची कंत्राटदारांना तंबी

