Sunday, 23 Feb, 2.50 pm वेबदुनिया

आज-काल
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी कवी व लेखक होते.यांचा जन्म 28 मे 1883 रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भंगुर गावी येथे हिंदू कोकणस्थ ब्राह्मण परिवारात झाला.यांचा वडिलांचे नाव दामोदर विनायक सावरकर आणि आईचे नाव राधाबाई दामोदर सावरकर होते. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी दुसरे होते. विनायक दामोदर सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव हे धाकटे भाऊ होते. सावरकरांची आई, ते निव्वळ नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्नी येसूबाई यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडिलांचे निधन इ.स. 1899 ला त्या वेळी पसरलेल्या प्लेग मुळे झाले.


स्वातंत्र्यलढ्यांतील चळवळीचे धुरीण क्रांतिकारक,भारतीय राजकारणातील महत्त्वाचे राजकारणी,हिंदू संघटक,जातिभेदाचा विरोध करणारे सामाजिक तिकारक,प्रतिभावंत,साहित्यिक प्रचारक भाषा आणि लिपी शुद्धीचे प्रणेते सावरकर होते. सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक आणि पत्रकार प्रह्लाद केशव अत्रे यांनी दिली आहे.

यांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालय मध्ये झाले. लहानपणापासूनच ते कुशाग्र बुद्धीचे होते. वक्तृत्व,काव्यरचनेवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. त्याची लेखणी आणि जिव्हा प्रखर चालत असे. त्यांनी वयाच्या13 वर्षी स्वदेशी फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र रचना केली .चापेकर बंधूंना फाशी दिल्याचे कळताच लहानग्या सावरकरांनी आपल्या कुलदेवी सामोरं "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारता-मारता मरे पर्यंत झुंजेन" अशी शपथ घेतली.

मार्च, इ.स.1901 मध्ये यांचे विवाह यमुनाबाईंशी झाले. यांना 4 अपत्ये झाली. प्रभाकर,प्रभा,शालिनी आणि विश्वास. इ.स. 1902साली लग्नानंतर फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व इ.स. 1906 साली उच्च शिक्षणासाठी परदेशात (लंडन)ला गेले.

सावरकरांनी पुण्यामध्ये इ.स.1905 साली विदेशी कापडांची होळी केली. श्यामजीकृष्ण वर्मानं ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती ह्यांना मिळाली.त्या नंतर ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले.त्यांनाच शिष्यवृत्ती मिळावी असे लोकमान्य टिळकाने सुचवले होते.लंडन मध्ये इंडिया-हाउस मध्ये वास्तव्यास असताना यांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठीत भाषांतर केले. याची प्रस्तावना करताना ह्यांनी सशस्त्र क्रांतींचे तत्त्वज्ञानं विशद केले होते. लंडनच्या इंडिया-हाउस मध्ये अभिनव भारताचे

क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रां यांचे पहिले हुतात्मा शिष्य होते. मदनलाल ने कर्झन वायली नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करून हसत हसत फाशीची शिक्षा स्वीकारली. त्याच काळात सावरकरांनी इतर देशातील क्रांतिकारी गटांशी संपर्क साधून त्यांच्यांकडून बॉम्बं तयार करायचे तंत्रज्ञान घेतले. ते तंत्रज्ञानआणि 22 पिस्तुले यांनी भारतात पाठवली. त्यांपैकीच एका पिस्तुलांनी अनंत कान्हेरे या 16 वर्षीय वीराने नाशिकच्या कलेक्टर जेक्सनचे वध केले. तत्पश्चात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे यांना तिघांना फाशी देण्यात आली.

राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापित केली. इ.स.1857 मध्ये इंग्रेजाविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचे इतिहासाला सावरकरांनी लिहिलेले ग्रंथ "अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर" होते. त्यांचे थोरले बंधूंना राजद्रोहावर लिखाणासाठीचे आरोपावरून काळ्यापाण्याची शिक्षा केली.या गोष्टीवर संतापून मदनलालधिंग्राने कर्झनला मारले. यांच्यात ज्या पिस्तुलाचा वापर करण्यात आल्या होत्या ते सावरकरांनी पाठविले कळल्यावर ब्रिटिश सरकाराने सावरकरांना अटक केली. त्यांना समुद्राच्या वाटेने भारतात आणताना त्यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारून पोहत-पोहत फ्रान्सचा समुद्री किनारा गाठला. तिथून त्यांना अटक करून परत भारतात आणले. त्यांचा वर खटला चालवून त्यांना 2 जन्मठेपेची काळ्यापाण्याची शिक्षा अंदमानच्या तुरुंगात करण्यात आली. अंदमानातून सुटल्यावर त्यांना रत्नागिरीत स्थानबद्ध केले. त्यांनी हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी रत्नागिरीत कार्य केले. त्यांनी 500 मंदिरे अस्पृश्यांसाठी खोलले,अनेक आंतरजातीय विवाह लावले, सर्वांसाठी "पतीत-पावन-मंदिर "सुरु केले. ह्यात सर्व जातीच्या लोकांना प्रवेश सुरू केले. अनेक भोजनालय सर्वधर्मासाठीचे सुरू केले.

त्यांच्यातला विशेष गुण म्हणजे की ते फक्त विचार करून थांबत नव्हते तर कृतीतून करून दाखवायचे. त्यांनी त्यांच्या मृत्युपत्रात लिहिले होते की "माझे प्रेत शक्यतो विद्युत चितेवरच जाळण्यात यावे,जुन्या पद्धतीने माणसांनी खांद्यावर नेऊ नये किंवा कोणत्याही प्राणाच्या गाडीमधून नेऊ नये,तर ते यांत्रिक शववाहिकेतूनच विद्युत स्मशानात न्यावे. माझ्या मृत्यू निमित्त कोणीही आपले दुकान किंवा व्यवसाय बंद ठेवू नये. अशाने समाजाला फार त्रास होतो. संसारासाठी लागणाऱ्या वस्तू न मिळाल्याने त्रास होतो.माझ्या निधनाचे कोणतेही सुतक,विटाळा ज्याने कुटुंबीयांना त्रास होतो. अश्या रूढी पाळू नये. पिंडदान,काकस्पर्श सारख्या काळबाह्य गोष्टी पाळू नये.

यांचे निधन 26 फेब्रुवारी 1966 रोजी महाराष्ट्राच्या मुंबई शहरात दादर या ठिकाणी झाले.


Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Webduniya Marathi
Top