Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मॉडेल त्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; पोलिसांचा मोठा निर्णय.

मॉडेल त्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; पोलिसांचा मोठा निर्णय.

भोपाळ (मध्य प्रदेश): त्विशा शर्मा मृत्यू प्रकरणी ट्विस्ट आला असून, त्विशाच्या मृतदेहाचे दुसरे पोस्टमार्टम भोपाळच्या एम्स (AIIMS) रुग्णालयातच केले जाईल, असे भोपाळचे पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्य आरोपी समर्थ सिंह याला न्यायालयात हजर करून पोलिस त्याची ७ दिवसांची कोठडी (रिमांड) मागणार आहेत, जेणेकरून या प्रकरणातील प्रत्येक पैलूचा तपास करता येईल.

पोलिस आयुक्तांनी सांगितले की, आरोपी गेल्या १० दिवसांपासून फरार असताना जिथे कुठे लपला होता, त्याला आश्रय देणाऱ्या आणि वाचवणाऱ्यांवरही पोलिस कडक कारवाई करतील. एवढेच नव्हे तर, या प्रकरणातील दुसरी आरोपी आणि समर्थची आई (निवृत्त जिल्हा न्यायाधीश) गिरिबाला सिंह यांचीही सखोल चौकशी केली जाईल. समर्थ सिंह हा जबलपूरमध्ये आत्मसमर्पण (सरेंडर) करण्यासाठी पोहोचला होता. भोपाळ पोलिसांचे पथकही तिथे दाखल झाले होते. मात्र, न्यायालयाने त्याचे सरेंडर स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर जबलपूर पोलिसांच्या मदतीने भोपाळ पोलिसांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले आणि मध्यरात्री त्याला भोपाळला आणण्यात आले. समर्थची वैद्यकीय चाचणी (Medical Test) करून त्याला कोर्टात हजर केले जाईल आणि ७ दिवसांची पोलिस कोठडी मागितली जाईल.

 Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 165 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

दरम्यान, Miss Pune हा किताब पटकावलेल्या नोएडाच्या त्विशा शर्मा (वय ३३) या विवाहितेचा मृतदेह भोपाळ मधील तिच्या सासरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यावेळी ती दोन महिन्यांची गरोदर होती. 12 मे 2026 ला त्विशाने तिचा आयुष्य संपवले. तिचा नवरा समर्थ सिंग हा पेशाने वकील आहे. त्यांची ओळख 2024 मध्ये डेटिंग ॲप द्वारे झाली होती. 2025 मध्ये दोघांनी लग्न केलं. मुळची नोएडाची असलेली त्विशा लग्नानंतर भोपाळला गेली. लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यातच त्विशाचा मृतदेह तिच्या घरी आढळला.

मृत्यूपूर्वी तिने इंस्टाग्रामवर (instagram) मैत्रिणीला काही मेसेज केले होते. ते सध्या समोर आले आहेत. शिवाय त्विशाच्या आई-वडिलांनी आणि भावानेही तिच्या सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्विशाला झालेला त्रास तिने तिच्या मैत्रिणीला सांगण्याचा प्रयत्नही केला होता. तिच्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा तिने त्विशाशी संपर्क केला त्यावेळी ‘लग्नाच्या जाळ्यात मी अडकून पडले आहे’ तू यात अडकू नकोस. मला माहेरची आठवण येत आहे. मी नेमकं काय करावं हेच मला समजत नाहीये. माझ्या परीने मी प्रयत्न करते पण मला कोणीही समजून घेत नाही.. असं तिने तिच्या मैत्रिणीला सांगितलं होतं. हेच शब्द तिच्या अखेरचे शब्द ठरले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka