Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मॉडेल ट्विशाच्या मृत्यूला वेगळं वळण; Video आला समोर.

मॉडेल ट्विशाच्या मृत्यूला वेगळं वळण; Video आला समोर.

भोपाळ (मध्य प्रदेश): मॉडेल ट्विशा हिच्या मृत्यूनंतर खळबळ उडाली असून, तिने स्वत:ला संपवलं नाही तर तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप ट्विशाच्या कुटुंबियांनी केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर WhatsApp, सोशल मिडिया अॅपवर असलेल्या चॅट्समधून देखील ट्विशा ही भीतीखाली होती असे दिसत असल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे.

भोपाळमधील ट्विशा शर्मा (वय ३१) मृत्यू प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिच्या मृत्यूच्या काही वेळ आधीचे आणि नंतरचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट असून, हुंड्यासाठी तिचा छळ केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ट्विशा घटनेच्या काही वेळ आधी घराच्या छताकडे जाताना दिसत आहे. यानंतर, साधारण एका तासानंतर तिचा पती समर्थ सिंग आणि इतर दोन जण तिला जिन्यावरून खाली घेऊन जाताना दिसत आहेत. जिन्यावरच तिला शुद्धीवर आणण्यासाठी सीपीआर देण्याचा प्रयत्नही केला जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, ट्विशाच्या सासू आणि निवृत्त न्यायाधीश गिरीबाला सिंग यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. ट्विशा ही मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार घेत होती. तिला सिजोफ्रेनिया या गंभीर मानसिक आजाराची औषधं दिली जात होती. औषधं घेतल्यावर ती एक दिवस बरी असायची, पण नंतर पुन्हा तिची प्रकृती बदलायची. तिचे हात थरथरायचे, ती गांजाही ओढायची, अशी कबुली तिने दिली होती. आपला मुलगा समर्थ हा एक सक्षम वकील असून त्याने कधीही अंमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचा दावाही त्यांनी केला.”

ट्विशाचा विवाह गेल्या वर्षी ९ डिसेंबर रोजी समर्थ सिंग याच्याशी झाला होता. लग्नानंतर अवघ्या ५ महिन्यांतच तिने टोकाचे पाऊल उचलले. तिचे शारीरिक आणि मानसिक शोषण केले जात असल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. पोलिसांकडून दोन्ही पक्षांची बाजू पूर्णपणे समजून घेऊन तपास सुरू आहे. या प्रकरणात तपास पुढे सरकतोय तसे नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

 Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 165 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

विवाहीत प्रियकरच निघाला मॉडेल शीतल हिचा खूनी…

प्रसिद्ध मॉडेलची हत्या; नग्नावस्थेत सापडला मृतदेह…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka