Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे ग्रामीण आणि बारामती शहर पोलिसांची मोठी कारवाई.

पुणे ग्रामीण आणि बारामती शहर पोलिसांची मोठी कारवाई.

पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांनी आंतरराज्यीय गांजा तस्करी उघड केली असून, 23 किलो गांजा जप्त केला आहे. तर आतापर्यंत फेब्रुवारीपासून या कारवाईत तब्बल 634 किलो गांजा, दोन चारचाकी वाहने आणि इतर मुद्देमाल असा एकूण सुमारे 3 कोटी 3 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

प्रकाश काटे, समाधान गायकवाड, प्रिन्सकुमार सिंग, राहुल गोरे, विकी कांबळे, संग्राम सिंग, जॉकी माझी अशी आरोपींची नावे आहेत. तपासादरम्यान समाधान धर्मराज गायकवाड आणि विकी ऊर्फ पप्पू कांबळे यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने छत्तीसगडमधून गांजा आणून बारामती परिसरात साठवून ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून काही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आणखी साथीदारांची नावे समोर आली आहेत.

 Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 165 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी छत्तीसगडमधून मोठ्या प्रमाणावर गांजा आणून पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यात विक्रीचे जाळे उभे केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. 20 मे रोजी ते पंढरपूर-फलटणमार्गे बारामतीकडे येत असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. परंतु, त्यातील एक मोटार तासगावच्या दिशेने गेली. पोलिस व त्यांच्यामध्ये अंतर पडल्याने सांगली एलसीबीच्या मदतीने त्या मोटारीवर कारवाईत कऱण्यात आली. त्यात 134 किलो ग्रॅम वजनाचा 33 लाख 55 हजारांचा गांजा आढळला. विकी ऊर्फ पप्पू विजय कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. दुसऱ्या पथकाने बारामती-फलटण रस्त्यावर शहरानजीक गवारफाटा येते दुसरी मोटार ताब्यात घेतली. त्यात 23 किलो 11 लाख 55 हजार रुपयांचा गांजा आढळला. याप्रकरणी हुसेन लष्करे, आदित्य शिंदे , युवराज दुर्गे यांच्यावर कारवाई करण्यात आली. बारामतीतील विकी कांबळे हा इतर साथीदारांच्या मदतीने गांजा खरेदी करून आणत तो पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील अन्य विक्रेत्यांना विकत असल्याचे समोर आले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

IPS विनायक भोसले यांनी बनावट कर्ज टोळीचा केला पर्दाफाश…

पुणे! माझी बायको कुठंय? मित्रावरच आला संशय अन् रात्रीच्या अंधारात…

महाराष्ट्र पोलिस दलात मोठा फेरबदल; अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या…

पुणे गँगवॉर! अक्षय म्हस्के हल्ला प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; पाहा आरोपींची नावे…

Video: पुणे शहरात युवकावर कोयत्याने सपासप वार, पुलावरून खाली पडला अन्…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka