Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
महाराष्ट्र पोलिस दलात मोठा फेरबदल; अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या.

महाराष्ट्र पोलिस दलात मोठा फेरबदल; अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या.

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्य पोलिस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल केला आहे. गृह विभागाने अनेक वरिष्ठ आयपीएस (IPS) आणि राज्य पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश जारी केले आहेत.

DIG दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये मोठा फेरबदल करण्यात आला आहे. शिवाजी राठोड यांची नागपूरहून ठाणे शहरात अपर पोलिस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तर प्रमोद शेवाळे यांची एटीएस (ATS) पुणे येथून नवी मुंबई गुन्हे शाखेत अपर पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. याशिवाय, विनीता साहू यांना एसआरपीएफ (SRPF) मुंबई येथे DIG पदाची जबाबदारी देण्यात आली असून अशोक दुधे यांची ठाणे शहरात अपर पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. आर. राजा यांना पदोन्नती देत अपर पोलिस आयुक्त मुंबई येथे नेमण्यात आले आहे.

शीला साईल यांची मुंबई शहरात डीसीपी (DCP) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बाळासाहेब पाटील, विवेक पानसरे आणि निलेश सोनावणे या अधिकाऱ्यांची ठाणे शहरात बदली करण्यात आली आहे. श्रीकांत परोपकारी यांच्याकडे तटीय सुरक्षा विभागाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच रविंद्र परदेशी यांची SRPF गट-1 पुणे येथे समादेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ग्रामीण आणि इतर जिल्ह्यांमध्येही गृह विभागाने नवीन नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये प्रकाश जाधव यांची छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक (SP) म्हणून नियुक्ती झाली आहे. तर विनय राठोड यांची ठाणे ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे. संभाजी कदम यांना ATS पुणे येथे SP म्हणून जबाबदारी देण्यात आली असून विवेक पाटील यांच्याकडे सीआयडी (CID) पुणेची धुरा सोपवण्यात आली आहे.

संजय सरगुंडा पाटील आणि अमोल झेंडे यांची मिरा-भाईंदर, वसई-विरार (MBVV) येथे DCP म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विक्रांत देशमुख यांची पिंपरी-चिंचवड येथे बदली झाली आहे. प्रिती टिपरे यांची एफडीए (FDA) मुंबई येथे सहआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर हिंमत जाधव यांच्याकडे पुणे येथे नार्कोटिक्स टास्क फोर्सची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान, या मोठ्या बदल्यांच्या प्रक्रियेत काही अधिकाऱ्यांच्या पूर्वीच्या बदली आदेशांना प्रशासनिक कारणास्तव स्थगिती देण्यात आली आहे. यामध्ये कुमार चिंथा, नित्यानंद झा, अकबर पठाण आणि दिपक गिऱ्हे यांच्या बदली आदेशांमध्ये ऐनवेळी बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती गृह विभागाच्या आदेशात देण्यात आली आहे.

राज्यात पोलिस दलात मोठे बदल; 24 बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…

राज्यातील बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा नावे…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka