Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Spine Road: उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्देशानंतर स्पाईन रोडची अधिकाऱ्यांकडून पाहणी

Spine Road: उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्देशानंतर स्पाईन रोडची अधिकाऱ्यांकडून पाहणी

प्रभात 3 weeks ago

चिखली - सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांना याबाबत निवेदन देऊन पाठपुरावा केला होता. त्यानंतर अवघ्या २४ तासांत पिंपरी-चिंचवड महापालिका, वाहतूक विभाग, बीआरटी विभाग, स्थापत्य विभाग, आरोग्य विभाग, अतिक्रमण विभाग तसेच पोलीस प्रशासनाचे अधिकारी स्थानिक आजी माजी नगरसेवकांच्या सोबत घटनास्थळी दाखल झाले.

कुदळवाडी चौक ते कृष्णानगर संविधान चौक या स्पाइन रोडवरील अनधिकृत पार्किंग, वाढती वाहतूक कोंडी, सार्वजनिक फुटपाथवरील अतिक्रमणे, झाडतोड तसेच नागरिकांच्या विविध समस्यांबाबत करण्यात आलेल्या पाठपुराव्यानंतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी संयुक्त पाहणी दौरा केला.

यावेळी स्पाइन रोडची प्रत्यक्ष पाहणी करून अनधिकृत पार्किंग हटविणे, वाहतूक कोंडी कमी करणे, नागरिकांसाठी फुटपाथ मोकळे करणे तसेच सुरक्षित व सुरळीत वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.

पाहणी दरम्यान वाहतूक विभागाचे निरीक्षक घाडगे, चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे अतुल पाटील तसेच स्थापत्य, आरोग्य, अतिक्रमण, बीआरटी आणि वाहतूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मारुती जाधव म्हणाले, “नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रभाग क्रमांक ११ मधील वाहतूक कोंडीमुक्त, सुरक्षित आणि सुकर वाहतूक व्यवस्थेसाठी माझा पाठपुरावा आणि लढा यापुढेही कायम राहील.

यामध्ये कोणतेही पद आणि पालिकेत सत्ताधारी पक्षात नसणारा समाजिक कार्यकर्ता मारुती जाधव हा लोकप्रतिनिधी पेक्षा अधिक दक्ष असल्याचा भावना नागरिकांनी बोलताना व्यक्त केल्या आहेत.

Kamshet : समाधानकारक पावसामुळे भातलागवड अंतिम टप्प्यात

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat