Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Sonam Wangchuk यांनी मोदी सरकारच्या कामाचे केले कौतुक; म्हणाले.

Sonam Wangchuk यांनी मोदी सरकारच्या कामाचे केले कौतुक; म्हणाले.

दिल्लीतील जंतर मंतर येथे २६ दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) लडाखला परतले आहेत. दिल्लीहून श्रीनगरला परतताना त्यांनी वंदे भारत ट्रेनचा आनंद घेतला. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (X) एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्यांनी रेल्वे आणि चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची प्रशंसा केली आहे.

या व्हिडिओवरून सरकारबद्दलच्या त्यांच्या भूमिकेत बदल झाल्याचे दिसून येते.

“मला ट्रेनने प्रवास करायला आवडतो. पण वंदे भारतने प्रवास करणे हा एक वेगळ्याच प्रकारचा आनंद आहे,” असे सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) व्हिडिओमध्ये म्हणतात. खरे तर, पर्यावरण आणि शिक्षण सुधारणांसाठी ओळखले जाणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी या व्हिडिओमध्ये भारतीय रेल्वे आणि तिच्या अभियांत्रिकीची उघडपणे प्रशंसा केली. ते (Sonam Wangchuk) पहिल्यांदाच वंदे भारत ट्रेनने प्रवास करत होते. वांगचुक म्हणाले की, ट्रेन हे नेहमीच त्यांचे प्रवासाचे आवडते साधन राहिले आहे. मला भारतीय रेल्वेचा अभिमान आहे. मला भारतीय (सरकारच्या) आश्वासनांचाही अभिमान वाटायला हवा.

“मला भारतीय रेल्वेचा अभिमान आहे. मला विशेषतः चिनाब नदीवर बांधलेला जगातील सर्वात उंच रेल्वे कमानी पूल (चिनाब रेल्वे पूल) पाहायचा होता. वंदे भारत एक्सप्रेसमधून त्यावरून जाण्याचा अनुभव अत्यंत सुंदर आणि अद्भुत होता.” सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) म्हणाले, असे मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प देशाची तांत्रिक प्रगती आणि कनेक्टिव्हिटी दर्शवतात. रेल्वेच्या अभियांत्रिकी आणि पायाभूत सुविधांची प्रशंसा करण्यासोबतच, सोनम वांगचुक यांनी केंद्र सरकारला विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे आवाहन केले. दिल्लीतील जंतर मंतर येथे २६ दिवसांच्या उपोषणानंतर सरकारसोबत झालेल्या चर्चेचा संदर्भ देत, त्यांनी सरकारला आवाहन केले की, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि तरुणांवर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्याच्या आपल्या लेखी आश्वासनाचे पालन करावे, जेणेकरून देशातील तरुणांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होईल.

( Income Tax Return Filing Deadline : फक्त १० मिनिटांत विवरणपत्र भरता येतं का? अंतिम मुदतीला दोन दिवस शिल्लक असताना तज्ज्ञांनी दिला सोपा मार्ग)

चिनाब नदीवरील पुलाचे वर्णन भव्य असे करत, त्यांनी (Sonam Wangchuk) त्याला “अद्भुत” म्हटले. या मार्गाचे मुख्य आकर्षण म्हणजे रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर बांधलेला जगातील सर्वात उंच रेल्वे कमानी पूल. नदीपात्रापासून ३५९ मीटर उंची असलेला हा पूल, पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा अंदाजे ३५ मीटर उंच आहे. हा पूल ताशी २६६ किमी वेगापर्यंतचे वारे आणि रिश्टर स्केलवर ८ तीव्रतेचा भूकंप सहन करण्यास सक्षम आहे. वंदे भारत एक्सप्रेस (नवी दिल्ली-श्रीनगर) हा भारतीय रेल्वेच्या सर्वात महत्त्वाकांक्षी आणि ऐतिहासिक रेल्वे प्रकल्पांपैकी एक आहे. पूर्वी रस्त्याने (जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग) प्रवासाला ७ ते १० तास लागायचे, तर आता रेल्वे जम्मू ते श्रीनगर हे अंतर केवळ साडेतीन तासांत आणि दिल्ली ते श्रीनगर हे अंतर १३ तासांपेक्षा कमी वेळेत पार करते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post