Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'ॲग्रोवन'च्या कार्यकारी संपादकपदी रमेश जाधव

'ॲग्रोवन'च्या कार्यकारी संपादकपदी रमेश जाधव

पुणे : 'ॲग्रोवन'च्या कार्यकारी संपादकपदी रमेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या 'ॲग्रोवन'चे निवासी संपादक म्हणून कार्यरत आहेत.

रमेश जाधव यांना पत्रकारितेचा सुमारे २३ वर्षांचा अनुभव आहे.

त्यांनी वसुंधरा इकॉलॉजी अॅण्ड रिसर्च फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेत 'सुसंवाद' या मासिकाचे संपादक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. 'ॲग्रोवन'मध्ये प्रशिक्षणार्थी बातमीदार व उपसंपादक, उपवृत्तसंपादक, दिवाळी अंकांचे संपादन, 'ॲग्रोवन' डिजिटलच्या संपादकीय विभागाचे प्रमुख, 'ॲग्रोवन'चे निवासी संपादक अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.

रॉयटर्स मार्केट लाइट या शेतीविषयक माहितीसेवेत महाराष्ट्र प्रतिनिधी व त्यानंतर वृत्तसंपादक म्हणून काम पाहिले. जाधव यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथून कृषी शाखेचा पदवी प्राप्त केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागातून (रानडे इन्स्टिट्यूट) पदव्युत्तर पदवी संपादन केली.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा

मराठी विचारांची डिजिटल नगरी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Iye Marathichiye Nagari