Dailyhunt
नीलकांचन ग्रंथाचे रविवारी कल्याणला प्रकाशन

नीलकांचन ग्रंथाचे रविवारी कल्याणला प्रकाशन

  • अमेरिकास्थित लेखिका पल्लवी शिंदे-माने लिखित ग्रंथ
  • प्रभा प्रकाशन कणकवली तर्फे प्रकाशित

आठवणींचा भुंगा कधी पाठ सोडत नाही; तर कधी विचाराचं काहूर सतत डोक्यात चालू असतं. अशावेळी शब्द जवळ येतात आणि त्या शब्दातून आपल्या भावनांची कोंडी मोकळी करण्याचं काम लेखनातून होत असतं अशा सामर्थ्याने हे लेखन केले आहे.

पल्लवी शिंदे माने, लेखिका

कणकवली / कल्याण : प्रभा प्रकाशन, कणकवली यांच्या वतीने अमेरिकास्थित मराठी लेखिका पल्लवी शिंदे माने लिखित 'नीलकांचन' या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन रविवारी (१९ एप्रिल) सायंकाळी ४ वाजता कल्याण येथील बालक मंदिर संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.

कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात मराठी साहित्य अभ्यासक डॉ. निर्मोही फडके यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते पांडुरंग निरंजन भारती आणि चित्रपट दिग्दर्शक विजय शिंदे उपस्थित राहणार आहेत.

प्रभा प्रकाशन, कणकवली ही कोकणातील प्रकाशन क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असून 'नीलकांचन' हे संस्थेचे ४२वे पुस्तक आहे. या ग्रंथाच्या लेखिका पल्लवी शिंदे माने या मूळच्या कल्याण येथील असून सध्या त्या अमेरिकेत स्थायिक आहेत. परदेशात वास्तव्यास असतानाही त्या सातत्याने विविध साहित्यप्रकारांमध्ये लेखन करत असून त्यांच्या पूर्वीच्या साहित्यकृतींना राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाले आहेत.

स्वप्नपूर्तीसाठी धडपडत राहाणे हाच मानवी मनाचा धर्म आहे - डॉ. यशवंत थोरात

'नीलकांचन' हा ललित लेखसंग्रह आठवणींच्या विविध पैलूंना स्पर्श करणारा आहे. छोट्या-छोट्या प्रसंगांना हृदयस्पर्शी शब्दांत मांडत मानवी नात्यांची उब आणि संवेदना जपण्याचा प्रयत्न या लेखनातून दिसून येतो. विचारांच्या गर्दीतून आणि आठवणींच्या ओघातून उमटणाऱ्या भावनांना शब्दरूप देत लेखिकेने हा संग्रह साकारला आहे.

आठवणींचा भुंगा कधी पाठ सोडत नाही; तर कधी विचाराचं काहूर सतत डोक्यात चालू असतं. अशावेळी शब्द जवळ येतात आणि त्या शब्दातून आपल्या भावनांची कोंडी मोकळी करण्याचं काम लेखनातून होत असतं अशा सामर्थ्याने हे लेखन लेखिका पल्लवी शिंदे माने यांनी केल्यामुळे हे लेखन नक्कीच वाचकांच्या पसंतीला पडेल असा विश्वास लेखिकेला वाटतो आहे.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा

मराठी विचारांची डिजिटल नगरी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Iye Marathichiye Nagari