Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अण्णा हजारेंची प्रकृती बिघडली; मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल

अण्णा हजारेंची प्रकृती बिघडली; मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल

Letsupp 3 weeks ago

Anna Hazare Hospitalised in Mumbai ICU: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना अधिक उपचारांसाठी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सध्या त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले असून डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस; सरकारचं शिष्टमंडळ आज अंतरवालीत, तोडग्याची शक्यता?

अण्णा हजारे यांना नेमकं काय झालं?

गेल्या काही दिवसांपासून अण्णा हजारे यांना खोकला, तीव्र ताप आणि अशक्तपणाचा त्रास जाणवत होता. त्यासोबतच शरीरातील पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने त्यांना डिहायड्रेशनचा त्रास झाला. त्यांना गंभीर स्वरूपाचे व्हायरल इन्फेक्शन झाल्याचीही माहिती आहे. प्राथमिक उपचार करूनही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईत हलवण्यात आले.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार

बॉम्बे हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध फिजिशियन डॉ. गौतम भन्साळी आणि त्यांच्या टीमकडून अण्णा हजारे यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांकडून त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात येत असून, त्यांचे अहवाल आल्यानंतर पुढील उपचारांची दिशा निश्चित केली जाणार आहे.

आजपासून खिशाला झळ! दूध, CNG, रिक्षा-टॅक्सी महाग; जाणून घ्या आजपासूनचे नवे दर

अण्णा हजारे यांना गंभीर स्वरूपाच्या व्हायरल इन्फेक्शनसोबत डिहायड्रेशनचा त्रास झाल्याची माहिती आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत असले तरी अशक्तपणामुळे त्यांना ICUमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

राळेगणसिद्धीहून मुंबईत हलवले

अण्णा हजारे यांच्यावर सुरुवातीला अहिल्यानगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी परिसरात उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईत हलवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रुग्णवाहिकेतून त्यांना मुंबईत आणण्यात आले.

डॉक्टर रुपनवरांचा मृत्यू; रुग्णालयातील वाद अन् मानसिक त्रासामुळे डॉक्टरांनी उचलले टोकाचे पाऊल?

गेल्या काही काळापासून प्रकृतीच्या कारणामुळे अण्णा हजारे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तुलनेने कमी सक्रिय आहेत. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या समर्थक आणि चाहत्यांकडून लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp