Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जरांगे खालावले, मराठे पेटले! बीड-जालन्यात जाळपोळीसह मोठा राडा!

जरांगे खालावले, मराठे पेटले! बीड-जालन्यात जाळपोळीसह मोठा राडा!

Letsupp 3 days ago

Manoj Jarange Patil Protest Beed Jalna Tire Burning : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आल्यानंतर बीड (Beed) आणि जालना (Jalana) जिल्ह्यात मराठा समाज बांधवांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली.

जिल्ह्यातील महामार्गांवर विविध ठिकाणी आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

मराठा आरक्षणाच्या मसुद्यावर सरकार सकारात्मक; 'त्रुटी असतील तर सांगा, दुरुस्त करू,- विखे पाटील

जालना जिल्ह्यातील केदारखेडा येथे मध्यरात्री मराठा बांधवांनी जालना-जळगाव महामार्गावर टायर पेटवून निषेध नोंदवला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यांच्या मागण्यांवर सरकारने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज बांधवांनी उद्या (3 सप्टेंबर) जालना जिल्हा बंदची हाक दिली आहे. सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्याने जिल्हा बंदचा निर्णय घेतल्याचं आंदोलकांनी सांगितलं.

हा विषय तुमचा नाही! चर्चेला आलेल्या जिल्हाधिकारी अन् पोलीस अधीक्षकांचा प्रस्ताव जरांगे पाटलांनी फेटाळला

दुसरीकडे, बीडमध्येही मराठा बांधव रस्त्यावर उतरले. बीड-जालना महामार्गावर टायर पेटवून 'एक मराठा, लाख मराठा'च्या घोषणा देण्यात आल्या. आंदोलकांनी काही काळ रस्तारोको केल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांशी चर्चा केली आणि टायर रस्त्यावरून हटवण्यात आले.

मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी सरकारकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना आंतरवाली सराटी येथे पाठवण्यात आलं होतं. मात्र, संबंधित शिष्टमंडळ अद्याप भेटीसाठी का आलं नाही, असा सवाल करत मराठा बांधवांनी संताप व्यक्त केला. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी निषेध नोंदवला.

'भाजपचा पहिला फेकू कोण?'; संदीप देशपांडेंचा भाजपवर थेट निशाणा

जरांगे पाटील यांच्या प्रकृतीकडे सरकारने गांभीर्याने पाहावं आणि त्यांच्या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp