Manoj Jarange Mumbai March: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आज 18 व्या दिवशी पोहोचले आहे. आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून जरांगे आज, 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.
यावेळी त्यांच्यासोबत मोजकेच समर्थक असतील.
मुंबईत आधीच गर्दी अन्…., जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
त्यांच्या मुंबईतील प्रस्तावित आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही. यापूर्वी परवानगी नाकारल्यानंतर जरांगे यांच्या वतीने पुन्हा अर्ज करण्यात आला आहे. आता 19 सप्टेंबरऐवजी 18 सप्टेंबरलाच आंदोलनासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी जरांगेंकडून करण्यात आली आहे.
परवानगीच्या मुद्द्यावरून जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. "मुंबईत मी एकटाच आलो, तरी परवानगी देणार का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दुसरीकडे, परवानगी नाकारण्यात आल्यानेही मुंबईकडे जाण्याचा निर्णय जरांगेंनी कायम ठेवला आहे.
मोठी बातमी, मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा नाकारली परवानगी
दरम्यान, जरांगे मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाच्या जवळपास सर्व मागण्यांवर सरकारने सकारात्मक निर्णय घेतले आहेत. ज्या मागण्या संविधान आणि न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित आहेत, त्याबाबत घटनात्मक चौकटीतच निर्णय घ्यावा लागेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना किंवा गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, याचाही विचार करणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
तसेच, मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी न दिल्यानंतर जरांगे यांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागले आहे. परवानगी मिळाली नाही तरी मुंबईत जाण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, आपण एकटेच उपोषणाला बसणार असल्याचेही जरांगे यांनी जाहीर केले आहे.
दिशा सालियन प्रकरणात CBI ची मोठी कारवाई ; 6 वर्षांनंतर गुन्हा दाखल
कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षेचे कारण पुढे करत पोलिसांनी परवानगी नाकारली, असे जरांगेंचे मत आहे. त्यामुळे आता जरांगे प्रत्यक्ष काय निर्णय घेणार, याकडे मराठा समाजाचे आणि महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

