Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Ranji Trophy 2026-27 मोहम्मद सिराजकडे मोठी जबाबदारी; कर्णधार म्हणून निवड

Ranji Trophy 2026-27 मोहम्मद सिराजकडे मोठी जबाबदारी; कर्णधार म्हणून निवड

Letsupp 3 days ago

Ranji Trophy 2026-27 : लवकरच रणजी ट्रॉफी 2026-27 ची सुरुवात होणार असून या स्पर्धेसाठी बीसीसीआयसह विविध राज्यांच्या संघांनी जोरदार तयारी देखील सुरु केली आहे. तर आता एक मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

भारतीय स्टार खेळाडू मोहम्मद सिराजकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने (HCA) आगामी रणजी हंगामासाठी त्याची संघाचा नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.

मोहम्मद सिराजची कर्णधारपदी नियुक्ती

‘स्पोर्टस्टार’च्या वृत्तानुसार, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ निवड समितीने शुक्रवारी हा निर्णय घेतला. आगामी ‘रेड-बॉल’ (पारंपारिक चार-दिवसीय) हंगामासाठी (Ranji Trophy 2026-27) सिराज (Mohammed Siraj) संघाची धुरा सांभाळेल, तर डावखुरा वेगवान गोलंदाज चामा मिलिंद याची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हैदराबाद संघ ‘एलिट ग्रुप बी’चा भाग आहे आणि त्यांचा पहिला सामना त्रिपुरा विरुद्ध होणार आहे. ही स्पर्धा ११ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. कर्णधार म्हणून मोहम्मद सिराजचा हा पहिलाच पूर्ण हंगाम असेल. यापूर्वी त्याला बाद फेरीच्या (नॉकआउट) सामन्यांमध्ये ही जबाबदारी देण्यात आली होती, परंतु त्याला विशेष प्रभाव पाडता आला नव्हता.

मागील रणजी ट्रॉफी हंगामात मोहम्मद सिराजने दोन सामन्यांत हैदराबादचे नेतृत्व केले होते. राहुल सिंगच्या जागी स्पर्धेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी HCA ने त्याची कर्णधारपदी नियुक्ती केली होती. सिराजच्या नेतृत्वाखाली हैदराबादला मुंबईविरुद्ध नऊ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता, तर छत्तीसगडविरुद्धचा सामना अनिर्णित राहिला होता. सिराजच्या नेतृत्वाखाली हैदराबादला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अद्याप विजय मिळवता आलेला नाही.

अहिल्यानगर, पुणेसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस; जाणून घ्या अंदाज –

मोहम्मद सिराजसाठी स्वतःची छाप पाडण्याची संधी

मोहम्मद सिराजकडे अनुभव आहे आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी देखील उत्कृष्ट राहिली आहे. मात्र, कर्णधार म्हणून त्याने स्वतःला अद्याप सिद्ध केलेले नाही. जरी त्याने गेल्या हंगामात केवळ दोन सामन्यांत नेतृत्व केले असले, तरी आता तो जवळपास संपूर्ण हंगामासाठी हैदराबादचे नेतृत्व करणार आहे. सिराजसाठी आपली नेतृत्वक्षमता सिद्ध करण्याची आणि हैदराबाद संघाला पुढे नेण्याची ही एक चांगली संधी आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp