Dailyhunt
TV actress Subhashini : टीव्ही अभिनेत्रीची आत्महत्या, गळफास घेण्यापूर्वी पतीशी वाद

TV actress Subhashini : टीव्ही अभिनेत्रीची आत्महत्या, गळफास घेण्यापूर्वी पतीशी वाद

Letsupp 3 weeks ago

TV actress Subhashini : लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री सुभाषिणीने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. ती सन टीव्हीवर (Sun TV) प्रसारित होणाऱ्या कायल या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत होती.

तिच्या निधनामुळे सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सुभाषिणीचे तिच्या पतीशी वाद झाले होते असा आरोप करण्यात येत आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला कौटुंबिक बाबींवरुन सुभाषिणीचे तिच्या पतीशी वाद झाल्याचे वृत्त आहे. सुभाषिणी चेन्नईच्या अय्यप्पंथंगल भागात असलेल्या एका खाजगी अपार्टमेंटमध्ये राहत होती. मूळची श्रीलंकेची सुभाषिणी यापूर्वी पतीसोबत बंगळुरुमध्ये राहत होती मात्र कामाच्या वेळामुळे ती गेल्या काही दिवसांपासून चेन्नईच्या पोरुर भागात राहत होती.

माहितीनुसार, सुभाषिणीने (Subhashini) काल रात्री तिच्या पतीशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला होता. यावेळी काही कौटुंबिक बाबीवरुन दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगितले जात आहे.

तर दुसरीकडे या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थी दाखल होऊन सुभाषिणीचा मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरु केला आहे. या प्रकरणात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तिच्या पतीशी व्हिडिओ काॅलवर तिने संवाद साधला होता. यावेळी कौटुंबिक वाद निर्माण झाला ज्यामुळे तिने मानसिक त्रासातून आत्महत्या केली.

कोरोना काळात नियमांचे उल्लंघन, न्यायालयाने सुनावली 9 पोलीस अधिकाऱ्यांना फाशी; नेमकं प्रकरण काय?-

'कायल' ही मालिका अत्यंत लोकप्रिय आहे. पी. सेल्वम यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेत अभिनेत्री सुभाषिणी, चैत्रा रेड्डी आणि संजीव कार्तिक यांच्यासोबत एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत होती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp