मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपण मंत्रिपदासाठी दिल्लीला गेलो नव्हतो, असा स्पष्ट खुलासा करत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. दिल्ली दौरा हा मतदारसंघातील विकासकामे व निधीच्या पाठपुराव्यासाठीच असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्रीपदापेक्षा जनतेची सेवा महत्त्वाची असल्याचे नमूद करत सात वेळा निवडून येणे हेच मोठे बक्षीस असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सलग 12 वर्षांच्या कार्यकाळाचे कौतुक करत जनतेने त्यांच्या नेतृत्वावर सातत्याने विश्वास व्यक्त केल्याचे सांगितले. तसेच इंडिया आघाडीच्या नेतृत्वाच्या मुद्द्यावरही त्यांनी विरोधकांवर टीका केली.
The post मंत्रिपदासाठी दिल्लीला गेलो नव्हतो : मुनगंटीवार appeared first on Lokmanthan | लोकमंथन.

