Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रांजणगाव देशमुख सोसायटीच्या अध्यक्षपदी दिघे, गुडघे उपाध्यक्ष

रांजणगाव देशमुख सोसायटीच्या अध्यक्षपदी दिघे, गुडघे उपाध्यक्ष

कोपरगाव : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या रांजणगाव देशमुख येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी राजेश दिघे तर व्हाईस चेअरमनपदी आशाताई गुडघे यांची निवड करण्यात आली.

त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या निवडीबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, माजी आ.स्नेहलता कोल्हे, आमदार विवेक कोल्हे यांच्यासह विविध मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी रांजणगाव देशमुख विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी तसेच ग्रामस्थांच्या वतीने नवनियुक्त चेअरमन राजेश दिघे व व्हाईस चेअरमन आशा गुडघे यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत सोसायटीच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी प्रकाश गोर्डे, बाळासाहेब गुडघे, अनिल भालकर, सुरेश देशमुख, संपत खालकर, वीरेंद्र वर्पे, बाळासाहेब रणधीर, संतोष वर्पे, हरिभाऊ रहाणे, सुनील रणधीर, सुरेश चव्हाण, अशोक विघे, रामनाथ रहाणे, अजित गुडघे, धनंजय वर्पे, राहुल वर्पे, भाऊसाहेब गुडघे, प्रमोद गुडघे, चंद्रभान खालकर, सोमनाथ वर्पे, भगवान ठोंबरे, राजेंद्र ठोंबरे, संतोष बिडवे, बाळासाहेब बिडवे, रवींद्र खालकर, बाळासाहेब खालकर, सचिन गोर्डे, भाऊसाहेब गोर्डे, भाऊसाहेब रणधीर, संतोष रणधीर, विलास वामन,श्रावण खालकर, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan