Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

सुवर्णा शिंदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी

कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज (SSGM) महाविद्यालय, कोपरगाव येथील रसायनशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थिनी सुवर्णा देविदास शिंदे यांनी रसायनशास्त्रात आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे.

त्यांनी "Application of Ionic Liquids in Synthesis of Oxygen and Nitrogen Heterocycles" या विषयावरील आपला संशोधन प्रबंध यशस्वीरीत्या सादर करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्राप्त केली.

या महत्त्वपूर्ण संशोधन कार्यासाठी त्यांना प्रो. डॉ. मोहन सांगळे व डॉ. विलास गाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या संशोधन प्रबंधाच्या खुल्या मौखिक परीक्षेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथील रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रो. डॉ. सुरेश गायकवाड यांनी बाह्य परीक्षक म्हणून काम पाहिले. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रो. डॉ. सतीश परदेशी यांनी या परीक्षेचे अध्यक्षस्थान भूषविले.

या मौखिक परीक्षेप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे, डॉ. घनश्याम भगत, डॉ. बंडेराव तऱ्हाळ, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ. निलेश मालपुरे, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रतिभा रांधवणे आणि कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.

सुवर्णा शिंदे यांनी मिळवलेल्या या उत्तुंग यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ऍड. भगीरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ऍड. संदीप वर्पे, महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या चैताली काळे, आमदार विवेक कोल्हे, सुनील गंगुले, व बाळासाहेब आव्हाड यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan