Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तळेगाव एमआयडीसीतील दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू

तळेगाव एमआयडीसीतील दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू

पुणे : मावळ तालुक्यातील तळेगाव औद्योगिक परिसरातील नवलाख उंबरे येथील एका उत्पादन उद्योगात कार्बन डायऑक्साइड वायूची गळती झाल्याने भीषण दुर्घटना घडली. या घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

सुरुवातीला वायू सिलिंडरचा स्फोट झाल्याची चर्चा होती; मात्र प्राथमिक तपासात वायूगळतीमुळे ही दुर्घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
मृत कामगारांची ओळख गणेश उंबरे आणि वैभव थोरात अशी झाली आहे. तर श्रीकृष्ण साहू, गौरीशंकर शर्मा आणि नरसिंह पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच उद्योग प्रशासन, सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वायूगळतीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून या दुर्घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रात चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan