Water and Conservation Department Bharti 2026
मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड यांनी गेल्या दहा महिन्यांत जलसंधारण विभागातील पदभरतीसंदर्भात तब्बल आठ वेळा घोषणा केल्या. मात्र या सर्व घोषणा कागदावरच राहिल्या असून, प्रत्यक्ष भरतीप्रक्रियेला कोणतीही सुरुवात झालेली नाही. प्रशासकीय स्तरावर सर्व परवानग्या मिळाल्या असतानाही, विभागातर्फे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. मृद व जलसंधारण विभागातील ८६६७ पदे भरण्यासाठी सादर केलेल्या आकृतिबंधाला वित्त विभागाची मान्यता मिळाल्याचे विधान परिषदेत सांगण्यात आले. मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड यांनी गेल्या दहा महिन्यांत जलसंधारण विभागातील पदभरतीसंदर्भात तब्बल आठ वेळा घोषणा केल्या. मात्र या सर्व घोषणा कागदावरच राहिल्या असून, प्रत्यक्ष भरतीप्रक्रियेला कोणतीही सुरुवात झालेली नाही.
त्यामुळे लवकरच ही पदे भरली जाणार आहेत, परंतु हि नेमकी कधी पासून हि भरती सुरु होणार या वर मात्र प्रश्नचिन्ह आहे. प्रशासकीय स्तरावर सर्व परवानग्या मिळाल्या असतानाही, विभागातर्फे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. मृद व जलसंधारण विभागातील ८६६७ पदे भरण्यासाठी सादर केलेल्या आकृतिबंधाला वित्त विभागाची मान्यता मिळाल्याचे विधान परिषदेत सांगण्यात आले. २९ जुलैला आकृतिबंध तातडीने प्रदर्शित करण्याचे आदेशही देण्यात आले होते. परंतु तीन महिन्यांनंतरदेखील कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. या भरती संदर्भातील पूर्ण अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप व निवड पद्धती येथे बघा.
“विभागाला भरती करायचीच नसेल, तर आठ वेळा घोषणा करून तरुणांना खोटी आशा दाखवायचे कारण काय? त्यामुळे मृद व जलसंधारणमंत्री राठोड यांनी लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करून या भरतीला लागलेले ग्रहण दूर करावे,” अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. याविषयी संवाद साधला असता इंजिनिअरिंग असोसिएशन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, “जलसंधारण विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी कनिष्ठ अभियंतापदासाठी शेवटची जाहिरात २०२३ मध्ये जाहीर करण्यात आली होती. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी २०१७ पासून एकही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. या संदर्भात अनेक वेळा मंत्र्यांना निवेदने दिली; पण प्रत्यक्षात काहीच झाले नाही. विद्यार्थ्यांनी या भरतीच्या आशेवर इतर नोकऱ्यांचा विचारही केला नाही. आता सर्व परवानग्या मिळाल्या असूनही सरकारकडून कार्यवाही करण्यात येत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी मानसिक तणावात आहेत. सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नये आणि तातडीने जाहिरात प्रसिद्ध करावी.”
मित्रांनो, एक आनंदाची बातमी, आत्ताच प्राप्त नवीन माहिती नुसार, मृद व जलसंधारण विभागातील सुमारे ८ हजार ६६७ रिक्त पदांची भरती करण्याची घोषणा वर्षभरापूर्वी मंत्री संजय राठोड यांनी केली असतानाही ही प्रक्रिया रखडली आहे. आता तरी या पदांच्या भरती प्रक्रियेला वेग द्या. मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांनी तातडीने जाहिरात प्रसिद्ध करून ही प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. वाढते वय आणि बेरोजगारीमुळे अभियंत्यांमध्ये चिंता वाढली असून वेळेत जाहिरात प्रसिद्ध झाल्यास अनेक अभियंत्यांना रोजगाराची संधी मिळेल, असेही त्यांनी यामध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्यातील मृद व जलसंधारण विभागाच्या पदभरती प्रक्रियेस गतीमान्यता भरतली आहे. या सर्व प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी विभागाचे सचिव दर आठवड्याला बैठक घेऊन प्रगतीचा आढावा घेतील. पदभरतीची जाहिरात लवकर प्रसिद्ध व्हावी आणि प्रक्रिया तात्काळ सुरू होईल, असे समजते. या नवीन अपडेट मुळे हि भरतीची नवीन जाहिरात लवकरच प्रकाशित होणार असल्याने हि उमेदवारांसाठी निश्चितच आनंदाची बाब आहे. हि भरती जाहिरात म्हणजे सरकारी नोकरीची एक मोठ्ठी संधी राहणार आहे. यात 8667 पदे भरण्यात येणार असल्याचे समजते.
या नवीन अपडेट मुळे, अखेर मृद आणि जलसंधारण विभागाच्या स्थापनेपासून रखडलेली विविध पदांची भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागली आहे. विभागातील एकूण ८ हजार ६६७ पदांच्या भरतीस उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिली असून, लवकरच भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री संजय राठोड यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. सन २०१७ मध्ये शासनाने मृद आणि जलसंधारण विभागाची स्थापना मान्य केली होती. त्यावेळी १६ हजार ४२३ पदांचा एक आकृतीबंध तयार करण्यात आला होता. ही पदे जलसंपदा व कृषी विभागांकडून नव्याने निर्माण होणाऱ्या विभागाकडे वर्ग करण्यात येणार होती. मात्र, काही कारणांमुळे ही पदे विभागाला मिळू शकली नाहीत. राज्यातील बदलत्या परिस्थितीचा सखोल अभ्यास करून, विभागाने नव्याने एक आकृतीबंध तयार केला आणि तो उच्चस्तरीय समितीकडे सादर केला. या आकृतीबंधात ८ हजार ६६७ नव्या पदांचा समावेश आहे. त्यातील अनावश्यक पदे वगळण्यात आली असून, उर्वरित पदांना उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली आहे.
या निर्णयामुळे विभागाची कार्यक्षमता वाढेल, जलसंधारण कामांना वेग मिळेल आणि राज्यातील सिंचन व्यवस्थेला बळकटी मिळेल. परिणामी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला. याशिवाय, विधान परिषदेत आणखी एक महत्त्वाची माहिती देताना त्यांनी सांगितले की, विभागाच्या अनेक कामांमध्ये अडथळे निर्माण झाले होते. ज्या योजनांना लोकांचा विरोध होता, ज्या योजना वनजमिनीच्या मुद्द्यावरून प्रलंबित होत्या, तसेच ज्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळूनही प्रत्यक्षात सुरूवात झाली नव्हती – अशा कामांचा सखोल आढावा घेऊन ती रद्द करण्यात आली आहेत. मात्र, भविष्यात गरज भासल्यास त्या योजनांचे पुन्हा एकदा पुनरावलोकन करून निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
: : PREVIOUS UPDATES : :
SWCD Maharashtra Bharti
Mruda Jalsandharan Vibhag Bharti – WCD (Water and Conservation Department) is going to recruit interested and eligible candidates to fill with the vacant posts. The name of the recruitment is “Water Conservation Officer, (Construction) Group-"B" (Non-Gazetted)”. There are total of 670 vacancies are available. haBharti.in. The tentative schedule of this recruitment will available soon. For more details about this read the given PDF Notification. Online application for this recruitment will start from 21st of December 2023. Also last date to apply is 10th of January 2024. For more details about SWCD Maharashtra Bharti 2024 visit our website www.MahaBharti.in.
Waterconserve Department Maharashtra Bharti 2023 Notification will published today,on 21st December 2023 as per Notice. candidates can check this page for full notification given below.
मृद व जलसंधारण विभागांतर्गत राज्यस्तर व जिल्हा परिषदस्तर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-"ब" (अराजपत्रित) या संवर्गातील 670 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. हि भरती प्रक्रिया TCS द्वारे राबविण्यात येणार आहे. या भरतीची जाहिरात आज प्रकाशित झाली आहे . या भरतीचे ऑनलाईन अर्ज २१ डिसेंबर २०२३ पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभरती अँप डाउनलोड करावी.

- पदाचे नाव - जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-"ब" (अराजपत्रित)
- पदसंख्या - 670 जागा
- शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण -
- वयोमर्यादा - १९ वर्ष
- खुल्या प्रवर्गासाठी कमाल – ३८ वर्षे
- मागासवर्गीयांसाठी – ४३ वर्षे
- दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत – ४५ वर्षा पर्यंत
- पात्र खेळाडुंच्या बाबतीत – ४३ वर्षा पर्यंत
- अनाथ उमेदवारांच्या बाबतीत – ४३ वर्षा पर्यंत
- ???? आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- अर्ज शुल्क -
- अमागास :- रु.१०००/-
- मागासवर्गीय / आ.दु.घ./अनाथ / दिव्यांग :- रु./-९००
- उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतीरीक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरीक्त असतील.
- परीक्षा शुल्क ना-परतावा (Non Refundable) आहे.
- अर्ज पद्धती - ऑनलाईन
- अधिकृत वेबसाईट – https://swcd.maharashtra.gov.in/
SWCD Maharashtra Vacancy
| पदाचे नाव | पद संख्या |
| जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-"ब" (अराजपत्रित) | 670 |
Educational Qualification For Mruda Jalsandharan Vibhag Recruitment
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-"ब" (अराजपत्रित) | उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्षे कालावधीची स्थापत्य अभियात्रीकी मधील पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा पदवी (Degree in Civil Engineering) किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणुन घोषीत केलेली अर्हता |
Salary Details For SWCD Water Conservation Officer Notification
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-"ब" (अराजपत्रित) | एस-१५:४१८००-१३२३०० |
Waterconserve Department Maharashtra Bharti – Important Documents
- एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणीक अर्हता
- वयाचा पुरावा
- शैक्षणीक अर्हता इत्यादीचा पुरावा
- सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्या बाबतचा पुरावा
- आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्या बाबतचा पुरावा
- वैध नॉन- क्रिमीलेअर प्रमाणपत्र
- पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
- खेळाडुसाठीच्या आरक्षणा करिता पात्र असल्याचा पुरावा
- अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- विवाहीत स्त्रीयांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन

