Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बालेवाडी क्रीडा संकुलात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा 'अचूक नेम'

बालेवाडी क्रीडा संकुलात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा 'अचूक नेम'

लहान खेळाडूंच्या आग्रहाखातर हातात घेतली रायफल; नेमबाजीत पटकावले १० पैकी १० गुण

पुणे : बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी नेमबाजीतील आपले कौशल्य दाखवत १० पैकी १० गुण मिळवले.

त्यांच्या या अचूक निशाण्यामुळे उपस्थित खेळाडू आणि अधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

पालकमंत्री सुनेत्रा पवार या बालेवाडी क्रीडा संकुलातील विविध विभागांची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या. नेमबाजी (शूटिंग) विभागाची पाहणी सुरू असताना, तेथे सराव करणाऱ्या लहान खेळाडूंनी त्यांना शूटिंग रायफल हातात घेऊन नेमबाजी करण्याचा आग्रह धरला. खेळाडूंच्या या आग्रहाखातर पवार यांनी रायफल हातात घेत लक्ष्यावर नेम साधला.

पहिल्याच प्रयत्नात त्यांनी अत्यंत अचूक निशाणा साधत १० पैकी १० गुण प्राप्त केले. त्यांच्या या नेमबाजी कौशल्याचे उपस्थित क्रीडा अधिकारी, प्रशिक्षक आणि मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले. या अनपेक्षित अनुभवामुळे सराव करणाऱ्या लहान खेळाडूंमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live