Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बारामतीत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण अभियान

बारामतीत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण अभियान

बारामती : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी बारामतीतील हॉस्पिटल रोड परिसरात भव्य वृक्षारोपण अभियान उत्साहात पार पडले. या उपक्रमात प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांसह पर्यावरणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली.

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान गेली अनेक दशके समाजप्रबोधनासह विविध सेवाभावी उपक्रम राबवत असून, वृक्षलागवड, रक्तदान, जलसंधारण, शैक्षणिक मदत आणि आरोग्यविषयक उपक्रमांद्वारे समाजसेवेचे कार्य सातत्याने करत आहे. त्याच सेवाकार्याचा भाग म्हणून बारामतीमध्ये हे वृक्षारोपण अभियान आयोजित करण्यात आले.

पद्मश्री तथा महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या अभियानात पर्यावरण संरक्षण, हरित बारामती आणि भावी पिढीसाठी स्वच्छ, निसर्गसंपन्न वातावरण निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी वृक्षांचे संगोपन करण्याची सामूहिक प्रतिज्ञा केली. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे जतन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live