Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; ५१ हजारांचा मुद्देमाल लंपास

बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; ५१ हजारांचा मुद्देमाल लंपास

बारामती : शहरातील फलटण रोड परिसरातील 'मिश्रीलाल डिस्ट्रीब्युटर्स' या टायरच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने तब्बल आठ टायर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत ५१ हजार ४१४ रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला असून, याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टायर व्यावसायिक तेजस मनोज मुथा (वय ३५) यांनी ३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास दुकान बंद केले होते. त्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. चोरट्याने दुकानात ठेवलेले ब्रिजस्टोन कंपनीचे १९५/६० आर १६ आकाराचे चार आणि १६५/७० आर १४ आकाराचे चार असे एकूण आठ टायर लंपास केले. चोरीस गेलेल्या या सर्व टायरची एकूण किंमत ५१ हजार ४१४ रुपये इतकी आहे.

​याप्रकरणी तेजस मुथा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०५(अ) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार धन्यादेवो विष्णू क्षीरसागर करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live