Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बारामतीत विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती, सासू, दिरासह चौघांवर गुन्हा!

बारामतीत विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती, सासू, दिरासह चौघांवर गुन्हा!

बारामती : महान्यूज लाईव्ह

बारामती तालुक्यातील तांदूळवाडी (कल्याणीनगर) येथे विवाहितेला हुंड्यासाठी व मानसिक-शारीरिक छळ केल्याच्या आरोपावरून तिच्या पतीसह चौघांविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या छळाला कंटाळून संबंधित विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसांकडे दिली आहे.

याप्रकरणी हाफिजा इम्रान शेख (वय 36, रा. संग्रामनगर, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नजीर निसार पठाण, सलमा निसार पठाण, अरमान निसार पठाण आणि प्रशांत तिराप्पा सोनकांबळे (सर्व रा. तांदूळवाडी, कल्याणीनगर, ता. बारामती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2022 पासून ते 4 जून 2026 पर्यंत आरोपींकडून मृत महिला आयेशा उर्फ जोया हिला वारंवार मारहाण, शिवीगाळ व मानसिक छळ केला जात होता. “तू माहेरी जायचे नाही, घराबाहेर पडायचे नाही” अशी सक्ती करण्यात येत होती. तसेच लग्नात मानपान योग्यरीत्या झाला नसल्याचे सांगून माहेरकडून पैसे आणण्याची मागणी केली जात होती.

कपडे व इतर जीवनावश्यक वस्तू न देऊनही तिचा छळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित छळाला कंटाळून आयेशा उर्फ जोया हिने 4 जून रोजी तांदूळवाडी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 268/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 80, 115(2), 351(2), 351(3), 3(5) तसेच हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 च्या कलम 4 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास फौजदार रामहरी भोसले करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live