Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बारामतीतला गोळीबार व्यावसायिक पूर्ववैमनस्यातून! फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे!

बारामतीतला गोळीबार व्यावसायिक पूर्ववैमनस्यातून! फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे!

बारामती : महान्यूज लाईव्ह

काल संध्याकाळी बारामतीतील बांधकाम व्यवसायिक राजन कोळेकर यांना instagram वरून दोन लाखाची खंडणी मागून नंतर यांच्या घरासमोर येऊन तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला.

दोन पिस्तुल यामध्ये वापरण्यात आले. त्यातील एक गोळी कोळेकर यांच्या डिफेंडर गाडीच्या पाठीमागच्या भागाला लागली आणि बारामतीमध्ये दहशत पसरली. अगदी काही ठराविक अंतराने हल्ल्याचे एकसारखे असे तीन प्रकार घडल्याने ही दहशत वाढली.

काही दिवसांपूर्वीच स्वयंघोषित उद्योगपती राणा सूर्यवंशी याच्यावरील हल्ल्याचे प्रकरण गाजले. हा हल्ला त्यानेच घडून आणल्याचे देखील एकंदर तपासातून निष्पन्न झाले होते, त्यानंतर आता पुन्हा हा हल्ला झाला. अर्थात पोलिसांनी आठ तासात गुन्हेगार शोधले. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून हा हल्ला कोळेकर यांच्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचे दिसून आले. फिर्यादी राजन धनंजय कोळेकर यांच्याकडे 2015 ते 2019 या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी यांचे कन्स्ट्रक्शन चे काम होत होते, त्या त्या ठिकाणी आरोपी बंड्या उर्फ अक्षय काळे बॉबकटचे मशीन त्या ठिकाणी चालवत होता व फिर्यादी व बंड्या उर्फ अक्षय काळे हे एकमेकाचे ओळखीचे होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान बारामतीत एकमेकांविरोधात गुन्हेगार वापरण्याची प्रथा सुरू झाली आहे का? असेच यातून दिसून येत आहे. कारण अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारीत वापरण्याचे प्रमाण हे वाढत चालले आहे. आता मात्र बारामती पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना वापरणाऱ्या पडद्यामागील गुन्हेगारांना सोडू नये अशी अपेक्षा सर्वसामान्य बारामतीकरांची आहे. आपापसातील वादातून गुन्हे घडतील आणि त्याचे खापर मात्र कायदा आणि सुव्यवस्था म्हणून बारामतीच्या पोलिसांवर फोडले जाईल. तसेही घडता कामा नये.

या सगळ्या निमित्ताने बांधकाम व्यवसायातील चुकीचे प्रकार, वाढती गुन्हेगारी, फसवणुकीचे वाढते प्रकार, व्यवहारातून वाढत चाललेले वैमनस्य आणि बांधकाम क्षेत्रातील नवे माफिया नव्याने शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. यालाही पायबंद घालण्याची गरज आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live