Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
माळेगाव साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी नितीन शेंडे!

माळेगाव साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी नितीन शेंडे!

बारामती, दि. ९ : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी नितीन वामनराव शेंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कारखान्याच्या संचालक मंडळाची सभा रविवारी (दि. ९ ऑगस्ट) पार पडली.

राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा कारखान्याच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार ही निवड प्रक्रिया पार पडली.

सभेच्या अध्यक्षस्थानी बारामती येथील सहायक निबंधक प्रमोद चंद्रकांत दुर्गुडे यांनी कामकाज पाहिले. निवडीनंतर नवनिर्वाचित उपाध्यक्ष नितीन शेंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना शेंडे यांनी अध्यक्षा सुनेत्रा पवार, संचालक मंडळ तसेच सर्व सभासदांचे आभार मानले. स्व. अजितदादा पवार यांच्या अपेक्षांनुसार कारखान्याची प्रगती, सभासद आणि कामगारांचे हित यांना केंद्रस्थानी ठेवून कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी कारखान्याच्या मावळत्या उपाध्यक्षा संगीताताई कोकरे, संचालक योगेश जगताप, नितीन सातव, रत्नकुमार भोसले, कामगार संचालक चंद्रशेखर जगताप यांच्यासह अनेक संचालकांनी नितीन शेंडे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, शिवराज जाधवराव, राजेंद्र दुर्गुळे, तानाजी कोकरे, स्वप्नील जगताप, गणपतराव खलाटे, विजय तावरे, प्रताप आटोळे, सतीश फाळके, अविनाश देवकाते, जयपाल देवकाते, देवीदास गावडे, ज्योती मुलमुळे, विलास देवकाते, दत्तात्रय येळे, रामदास आटोळे, विशाल जगताप, प्रभारी कार्यकारी संचालक श्रीकांत पाटील तसेच कारखान्याचे सभासद, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live